Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » मांढरदेवी ऍथलेटिक्स फाउंडेशन च्या खेळाडूंकडून मांढरदेव पठारावर वृक्ष संवर्धनाचे काम.

मांढरदेवी ऍथलेटिक्स फाउंडेशन च्या खेळाडूंकडून मांढरदेव पठारावर वृक्ष संवर्धनाचे काम. 

मांढरदेवी ऍथलेटिक्स फाउंडेशन च्या खेळाडूंकडून मांढरदेव पठारावर वृक्ष संवर्धनाचे काम. 

मांढरदेव प्रतिनिधी -मांढरदेवी येथील मांढरदेवी अथलेटिक्स फाउंडेशन च्या खेळाडूंच्या माध्यमातून मांढरदेव डोंगर पठारावर वृक्ष संवर्धनाचे काम चालू आहे, मांढरदेवी येथे मांढरदेवी ऍथलेटिक्स फाउंडेशन खेळाडूंना ॲथलेटिक्स प्रशिक्षण देण्याचे काम गेली कित्येक वर्ष करत आहे.

खेळाच्या प्रशिक्षणाबरोबरच डोंगर पठारावर वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचे काम खेळाडू करत असतात. यावर्षी पावसाळ्यामध्ये डोंगर पठारावर अनेक वृक्षांची लागवड खेळाडूंच्या माध्यमातून करण्यात आली होती पावसाळ्यानंतर या डोंगर पठारावर मोठ्या प्रमाणात गवत वाढते आणि जानेवारीनंतर या परिसरात समाजविघातक लोकांकडून वनवे लावले जातात यात जून जुलैमध्ये लावलेली छोटी झाडे जळून जातात व मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हानी होते यासाठी या झाडांचे संरक्षण करणे,संवर्धन करणे गरजेचे असते.

पावसाळ्यात लावलेल्या झाडांचे वनव्यापासून संरक्षण व्हावे म्हणून खेळाडूंनी झाडांच्या भोवतीचे गवत वीळा,खुरपे व ग्रास कटरच्या साह्याने कापून घेतले व झाडाभोवती आळे करून त्यांना पाणी देऊन त्यांचे संवर्धन करण्याचे काम खेळाडू करत आहेत. खेळाबरोबर आपण सामाजिक भान देखील जपणे गरजेचे आहे हे या खेळाडूंनी दाखवून दिले आहे त्यांच्या या कामाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वहागांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री.धनंजयराव वसंतराव पवार यांची बिनविरोध निवड

Post Views: 68 वहागांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री. धनंजयराव वसंतराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कराड प्रतिनिधी (सुनील पाटील )-

Live Cricket