मांढरदेव अवैध दारू विक्री बंदी बाबतचा ठराव ग्रामसभेमध्ये सर्वानुमते मंजूर
महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध जागृत देवस्थान म्हणून मांढरदेवची संपूर्ण राज्यात ओळख आहे.आणि याच देवस्थानच्या ठिकाणी अवैधरित्या सुरू असलेल्या दारू विक्रीवर बंदी आणण्या बाबत गावातील जागृत महिलांनी मागील पंधरा दिवसापासून आवाज उठविला आहे.त्यांनी ग्रामपंचायत ला पत्र देऊन अवैध दारू विक्री बंदी आणण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्याची मागणी केली होती.त्यांच्या या मागणीला प्राधान्य देऊन ग्रामपंचायत मांढरदेव यांस कडून दि.७ एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली.
त्या ग्रामसभेस गावातील महिला,पुरुष व युवक वर्ग बहुसंख्येने हजर होते.दारू पिण्यामुळे गावातील अनेक कुटुंबातील लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे.अनेकांचे आरोग्य धोक्यात असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहेत.अनेक कुटुंबाचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचे.महिलांकडून निदर्शनास आणून देण्यात आले.त्यामुळे भविष्यात होणारे बरेच धोके लक्षात घेता.गावामध्ये अवैधरित्या होत असलेल्या दारू विक्रीवर कायमस्वरूपी बंदी आणण्याचा ठराव महिलांकडून मांडण्यात आला.त्या ठरावावर चर्चा करून तो ठराव गावातील सर्व ग्रामस्थ,युवक व महिला यांस कडून एकमताने मंजूर करण्यात आला.या सभेस उपस्थित मांढरदेव गावचे बीट अंमलदार पो.कॉ उद्धव लिंबे यांच्याकडून येथे होत असलेल्या अवैधरित्या दारू विक्रीवर बंदी आणण्यासाठी पोलीस प्रशासना कडून कडक कार्यवाही करून संपूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगण्यात आले.
त्याचबरोबर मांढरदेवी गावा मध्ये बाहेरून येऊन बेकायदेशीर रित्या करत असलेल्या तीन पाणी(टायगर) जुगार आणि या धंद्या वर सुद्धा बंदी आणण्याचा ठराव मांडण्यात त्या धंद्यामुळे मांढरदेव गावची बदनामी होत असून.हा धंदा देखील गावातून बंद झाला पाहिजे.अशी सर्व ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली.आणि त्याबाबतचा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आला.याच बरोबर या सभेत गावातील अनेक विकास कामं बाबत सभेमध्ये चर्चा करण्यात आली.
या विशेष ग्रामसभेसाठी मांढरदेव गावचे सरपंच सौ सीमा मांढरे ग्रामपंचायत सदस्य गावातील पोलीस पाटील सौ.जयश्री मांढरे मांढरदेव बीटचे बीट आमदार उद्धव लिंबे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नामदेव हिरवे गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ ग्रामस्थ धर्माजी मांढरे,मारुती मांढरे,शंकर मांढरे,सोपान मांढरे,श्रीकांत कोचळे,परशुराम मांढरे,शंकर ना मांढरे,फुलचंद मांढरे.विश्वस्त,विजय मांढरे,चंद्रकांत मांढरे युवक व इतर ग्रामस्थ,महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
