Home » ठळक बातम्या » स्वार्थासाठी नाही तर मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारमध्ये सामील-आ.मकरंद पाटील

स्वार्थासाठी नाही तर मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारमध्ये सामील-आ.मकरंद पाटील

स्वार्थासाठी नाही तर मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारमध्ये सामील-आ.मकरंद पाटील

मला आमदारकी किंवा सत्तेचा माज नाही.कै.किसनवीर आबांनी उभारलेली सहकार मंदिरे वाचविण्यासाठी आणि मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सत्तेत सहभागी झालो हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे मी गद्दारी करण्याचा प्रश्नच नाही,मला सत्तेची हाव असती तर मी कॅबिनेट मंत्री झालो असतो असे प्रतिपादन आ.मकरंद पाटील यांनी केले.

वाई येथे झालेल्या विराट सांगता सभेत आ.पाटील बोलत होते.

या प्रसंगी खासदार.उदयनराजे भोसले,खासदार नितीन पाटील,जेष्ठ नेते बकाजिराव पाटील,दत्ता नाना ढमाल,प्रमोद शिंदे,विजय नाईकवडी,श्रीमती सुमनकाकी पाटील,आर.पी.आय चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष शारदा जाधव,उदय कबुले,राजेंद्र तांबे,राजू सेठ राजपुरे,शामराव गाडवे,प्रमोद शिंदे,मनोज पवार,अनिल भिलारे,विजय ढेकाणे,अनिल सावंत,अमित वनारसे,प्रशांत नागपूरकर,

या प्रसंगी आ.मकरंद पाटील म्हणाले की

मकरंद पाटील म्हणाले की मगीलव१५ वर्षात तुम्ही माझे काम,संपर्क पाहिलाय.मतदारसंघातील प्रत्त्येक गावाचा विकास मी केलाय.तीर्थक्षेत्र विकासाच्या संदर्भात काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे.माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला पक्ष,गट,तट न बघता न्याय देण्याचा प्रयत्न केला.कोरोना काळात गावागावांमध्ये गेलो.प्रत्येकाला मदत केली.लोकांची सेवा केली.

आज जी मंडळी निवडणुकीत उभी आहेत ती काळात कुठे होती.स्वतःची खाजगी रुग्णालये उभारून,कोरोना ग्रस्तांना मोफत उपचार केले.लोकांची सेवा करता करता मी ही करोना ने बाधित झालो.जीवघेण्या आजारातून बरा होऊन आल्यावर पुन्हा मदत करायला सक्रिय झालो.अतिवृष्टीच संकट आले.प्रत्त्येक गावात गेलो.अनेक गावांचा संपर्क तुटला होता.कुठे होते विरोधक तेव्हा.पावसाची,चिखलाची तमा न करता तब्बल १० दिवस महाबळेश्वर तालुक्यात मुक्कामी होतो.रस्ते,पूल वाहून गेले होते.गाव उद्ध्वस्त झाली होती.

 त्यावेळी सुध्दा अहोरात्र काम करून मी आपद ग्रस्तांना दिलासा दिला.महाबळेश्वर तालुक्यात २ वर्षात ४०० पूल निर्माण केले.

त्यावेळी आत्ता ओरडणारे विरोधक कुठे होते.

मांढरदेवची दुर्घटनेच्या काळातही मी आमदार नसताना सुध्हा तिथे जाऊन रात्रंदिवस काम केलं.त्यावेळी आजचे विरोधक कुठे होते.एकाला तर हाऊस आहे.निवडणूक आली की एका गड्याच्या अंगात येतं आणि तो उभा राहतोय.प्रत्त्येक वेळी पडतो.ना विचार ना पक्ष पण निवडणूक आली की बाबाने अर्ज भरलाच.दुसरे विरोधक अर्ज भरायच्या आदल्या दिवसापर्यंत आमच्या मांडीला मंडी लाऊन बसले होते..

सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मंत्री पद नाकारून त्यांची मान ताठ ठेवण्याचं काम केलंय.

मी स्वार्थासाठी गेलो नाही तर मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी गेलो.तिन्ही नगरपालिकांच्या २२५ कोटींच्या योजना मंजूर करून आणल्या.छत्रपती शिवरायांच्या प्रतापगड साठी १२१ कोटी,क्षेत्र महाबळेश्वर साठी १८७ कोटी रुपये आणले.नायगाव साठी १०० कोटी आणले.प्रत्त्येक गावागावांमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे केली.गावागावतले प्रश्न,अडचणी सोडवल्या.

आता येणाऱ्या काळात कैलासवासी लक्ष्मणराव पाटील यांच्या नावाने सर्व सुविधा असलेले भव्य हॉस्पिटल सुरू करणारे.ज्या हॉस्पिटल मध्ये गरीब माणसासाठी मोफत उपचार करणार.मागील २० वर्ष मी तुमच्या संपर्कात आहे.आणि आत्ता ८ दिवसात तुमच्या समोर आलेले विरोधक आमच्या बद्दल बोलतायत.

उदयनराजे भोसले म्हणाले की ज्येष्ठत्वाच्या नात्याने आम्ही शरद पवार यांचा खूप आदर करतो.पण कधी बोलायचं कस बोलायचं याच भान त्यांनी ठेवायला पाहिजे.ज्या पाटील कुटुंबीयांनी तुमच्या साठी आयुष्य वेचलं आहे,तुमचं हित जपलं आहे.तो माणूस गद्दार कसा असेल. ज्या मकरंद आबांनी आबांनी गावोगावी करोडी रुपयांची विकासकामे मार्गी लावली.ते आबा गद्दार कसे असतील. साहेब तुम्ही सुध्दा अनेक पक्ष फोडले.शरद पवार साहेबांचे नाव न घेता हल्ला चढविताना म्हणाले की तुम्ही तर यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खजिर खुपसून त्यांच्याशीच गद्दारी केली.मागील ६० वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा फक्त तुम्ही घोषणांचीच तुतारी वाजवली,लोकांची प्रगती होऊ दिली नाही,केलेल्या कोणत्याही घोषणांची अंबल बजावणी केली नाही.तुम्ही लोकांना फक्त फसवल आहे.छत्रपतीच्या विचारांचा वारसा घेऊन आमची युती चाललीय.तुम्ही तर ६० वर्ष लोकांचा विश्वासघात केला.तुमचं शासन नाकर्ते पणाच होत.आज मकरंद आबांच्या बद्दल तुम्ही चुकीचं बोलताना वाईट वाटत.आबांच्या सारखा काम करणारा नेता नाही.बावधन गट,संपूर्ण वाई खंडाळा,महाबळेश्वर, तालुका विकासाच्या मागे आहे.आणि प्रगतीचे दुसरे नाव मकरंद आबा आहे.लोकांची सेवा कारण ही आमची बांधिलकी आहे.मकरंद पाटील कधीच कुठेच कमी पडले का.आजची प्रचंड गर्दी पाहून अस वाटतंय की आजची ही सांगता सभा नसून आबांची विजयी सभा आहे.आबांनी येवढी काम केली आहेत म्हणूनच त्यांची कॉलर तुम्ही टाईट केलीच पाहिजे.आबा,विजयी सभेत तुम्ही कॉलर उडवली नाही तर मी येणारच नाही.नितीन काका आहेत,मी आणि आबा असे आम्ही तिघे आता या मतदार संघांचा काया पालट करणार असल्याचे आश्वासन या प्रसंगी उदयनराजे यांनी दिले.

शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष शारदा ताई जाधव म्हणाल्या की मकरंद आबा हे काँक्रिट आमदार म्हणजे पक्के आमदार आहेत.आबा हे आपलं नेतृत्व आहे.काँग्रेस वाल्यांनी महिलांना निराधार केलं.आणि आम्हा महिलांना लाडकी बहिण योजनेतून प्रत्येकी १५०० रुपये मिळाले तर ते या आमच्या ओवळणीना भीक दिली बोलले..आता तर महिलांना प्रत्त्येक महिन्याला २१०० रुपये मिळणार आहेत.आबांनी स्वतःची प्रॉपर्टी वाढवली नाही,तर जनतेसाठी सर्वस्व वाहून घेतलंय.जे जे सांगितलं आबांना ते ते केलं..आता लढाई कार्यकर्त्यांची आहे.

मराठा महासंघाचे अध्यक्षविक्रम वाघ म्हणाले की मकरंद आबा घासून नाय तर ठासून विजय मिळवणार.विरोधकांना एक पद दिलं तर तेही साधंजपता आळ नाही.

मनिषताई गाडवे म्हणाल्या की मकरंद आबा आपल्यासाठी रात्रंदिवस धावतात,राबतात.२८८ आमदारांमध्ये मकरंद पाटील नावाच्या पट्ट्याने ४५०० रुपयांचा निधीआणला आहे..तळ हाताने सूर्य झाकता येत नाही.आबांचे कर्तृत्व कधीच झाकता येणार नाही.तुम्ही लोक इतकी वर्ष सत्तेत होता तुम्ही बहिणींना ५०० रुपये तरी दिले का.आबांनी एवढा निधी दिलाय म्हणून आम्ही डोंगर कपारीतून येतोय.मकरंद आबा एक लाखाच्या मताधिक्याने येणार आहेत.

राजूशेठ रजपुरे म्हणाले की ही निवडणूक आबांची नाही तर कार्यकर्त्यांनी हातात घेतलीय…महाबळेश्वर तालुक्यातून आबांना २५००० मतांचे लीड देणार आहे.महाबळेश्वर तालुक्यात महायुतीचे सगळे घटक पक्ष आबांचे प्रामाणिकपणे काम करतायत.ग्रामीण भागातील विदारक परीस्थिती सुधारण्याचे काम आबांनी केलंय.महाबळेश्वर तालुक्यातील ११० गावातील ३० गावे ही मकरंद आबांना १०० टक्के मतदान करणारेत.विरोधकांना ८० टक्के गावात बूथ मिळणार नाहीत.मकरंद आववएक लाख मतांनी निवडून येणार. आहेत कारण आबांनी केलेलं काम,आबांचा संपर्क हेच या निवडणुकीत आपल्या विजयाचं गमक आहे.

प्रताप आण्णा पवार म्हणाले की मागील पाच वर्षांतील विकास बघा.आमचा आबंच्यावर विश्वास आहे म्हणून आबांना दिवडून द्यायचा सर्व जनतेचा अट्टाहास आहे. आबांचे हे नेतृत्व तळतावरील फोडासारख जपा.

आर.पी.आय चे अध्यक्ष अशोकराव गायकवाड म्हणाले की मी पहिल्या दिवसापासून आबांच्या सोबत आहे.आबा तुम्ही प्रत्त्येक कार्यकर्त्याला जवळ केलंय.माणसं जोडण्याची कला,आलेल्या माणसाला न्याय कसा द्यावा..हे मकरंद पाटील यांचेकडून शिकावं.तुमच्या अंगावर गुलाल पडल्याशिवाय आणि तुमच्या विजयाचा गुलाल आमच्या अंगावर पडल्याशिवाय शांत बसणार नाही.

नितीन भुरगुडे पाटील म्हणाले आजची ही गर्दी पाहून आज निवडणुकीचा निकाल लागला आहे.मकरंद पाटील यांना गद्दार म्हणायचं नाही.यशवंत राव चव्हाणांचे विचार जपण्याचं काम स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील आणि मकरंद आबांनी केलंय.४००० कोटी रुपयांची विकासकामे करणारे मकरंद आबा हे विकासपुरुष आहेत.

वाई तालुका काँगेसचे युवा अध्यक्ष प्रमोद अनपट,पुरुषोत्तम जाधव यांचे पुतणे सागर जाधव,गुळुंब येथील गणेश जाधव,वेळे येथील ऍडव्होकेट उमेश पवार यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

वाई मधील आ.मकरंद पाटील यांच्या विराट सभेने वाई मधील यापूर्वी झालेल्या सर्व सभांचे रेकॉर्ड मोडीत काढले.सभेपूर्वी वाई शहरातून हजारो कार्यकर्त्यांनी रॅली काढून मकरंद आबांच्या जयघोषाने वाई शहर आणि परिसर दुमदुमून काढला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 19 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket