फक्त वाई शहरासाठी मागील पाच वर्षात करोडो रुपयांची विकासकामे.-आ.मकरंद पाटील
वाई शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचामहाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा उभारणार.
सातारा दि.मागील पाच वर्षात फक्त वाई शहरामध्ये करोडो रुपयांची विकासकामे केलेली असून प्रत्त्येक वॉर्ड मध्ये १५ ते २० कोटींची विकासकामे झालेली आहेत. वाई मध्ये अतिशय आकर्षक आणि भव्य असा पुल उभारल्याने वाई च्या वैभवात भर पडली असून पुढील चार महिन्यात महाराष्ट्रातील सर्वात उंच असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
साकेवडी,वाई येथे वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आ.मकरंद पाटील बोलत होते या प्रसंगी माजी नगराध्यक्ष,संजय आप्पा लोळे,राजेश गुरव,चोरगे दादा,प्रदीप गुरव,शैलेश अनिल सावंत,श्रीकांत सावंत,प्रदीप जायगुडे, इ.मान्यवर उपस्थित होते
याप्रसंगी आ.मकरंद पाटील म्हणाले समाजातील छोट्यात छोट्या घटकाचा विचार करत आजपर्यंत मी माझे समाजकारण करत आलोय.छोट्यातील छोटी वाडी,वस्ती अशी सगळीकडे विकासकामे केली आहेत.आपल्या मतदार संघातील महाबळेश्वरचे प्रश्न वेगळे आहेत,वाईचे वेगळे आहेत,आणि खंडाळाचे प्रश्न वेगळे आहेत.मी बलकवडीच पाणी खंडाळा तालुक्यात आणल्याने खंडाळ्याच्या दुष्काळाचा कलंक पुसण्यात यशस्वी झालो.खंडल्यामध्ये इंडस्ट्री आली.अनेक कंपन्या आल्या त्यामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळाला.
वाई शहर ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा असलेलं संस्कारिक शहर आहे.वाई मध्ये असलेला ब्रिटिश कालीन पुलाच आयुष्य १०० वर्ष झालं होत.त्या पुलाची कालमर्यादा संपली होती.आज सांगायला आनंद,अभिमान वाटतो की याची कुणीही कल्पना केली न्हवती की पाच महिन्यात एवढा सुंदर पुल तयार होईल.पण कुणालाही कसलाही त्रास न होता एवढा छान पुल तयार झाला.वाई मध्ये भव्य अशी प्रशासकीय इमारत बांधली,त्यावर अजून एक मजला वाढवला,नगरपालिका चांगली झाली.घोटवडेकर यांच्या इथे आता नवीन पुल बांधणार आहे.
प्रतापगड किल्ल्यासाठी १२१ कोटी मंजूर करून आणले आहेत.क्षेत्र महाबळेश्वर ला १९७ कोटी आणलेत.महाबळेश्वर च्या विकासासाठी २०० कोटी आणलेत.वाई हून मांढरदेवला जाणारा भव्य काँक्रिटच्या रस्त्याचे काम वेगाने चालू आहे.सर्व बाबींचा विचार करून धोम धरणातून संपूर्ण वाई शहराला पिण्याच्या पाण्याची ६५ कोटींची योजना मंजूर केली आहे.कृष्णा नदीचं प्रदूषण होतंय,आता गटाराचे पाणी नदीमध्ये वाहू देणार नाही.त्यासाठी तब्बल २३ कोटी मंजूर केले आहेत.वाईतील प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्ड मध्ये १५ कोटी ते २२ कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत.वाई शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे.छत्रपती शिवाजी महाराज जाऊन ४०० वर्ष होतील.परंतु अजून वाई मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही.म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच अश्वारूढ पुतळा स्थानापन्न होणार आहे.हा पुतळा २२ फूट लांब २० फूट उंच असा आहे.पुतळ्या भोवती छान गार्डन तयार करण्यात येणार आहे.
मागील १५ वर्ष तुम्ही मला संधी दिली.मी प्रामाणिकपणे दिवसरात्र काम करतोय.
गोसावी, घिसाडि समाजाचे प्रश्न सुध्हा मी नक्की सोडविणार.इथल्या मंदिराचा प्रश्न मार्गी लावणारआहे.तुमच्या आग्रहाखातर किसनवीर कारखाना ताब्यात घेतला.२०१९ मधील जे पैसे मी देणं लागत न्हवतो ते शेतकऱ्यांचे जवळपास बुडालेले ५४ कोटी रुपये मी या दिवाळीच्या अगोदर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देऊन त्यांची दिवाळी गोड केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रताप आण्णा पवार म्हणाले की विकासाची गाथा आणि मकरंद आबांनी केलेल्या कामांची गीता सांगणं हाच आमचा प्रचार आहे.मकरंद आबांनी तुमच्या सांगण्यावरून कारखाना घेतला आणिआता तो कारखाना यशस्वीरीत्या चालवत आहेत.जी न होणारी कामे होती ती आबांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहेत.यापुढे असा आमदार होणार नाही.म्हणून हे नेतृत्व जतन करा.
माजी नगराध्यक्ष अनिल सावंत म्हणाले की वाई शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून आबांनी वाईकरांची मने जिंकली आहेत.आपली नगरपालिका क वर्ग असून ही ७६ कोटींची कामे आबांनी आणली.आता नदीच्या दोन्ही बाजूला जेष्ठ नागरिकांसाठी पादचारी मार्ग तयार होतोय.नाना नानी पार्क साठी दीड कोटीचा निधी मंजूर झालाय.स्मशान भूमीचा प्रश्न,स्मशान भूमी मंजूर झालीय.मुस्लिम दफन भूमीचा विषय होता,त्या रस्त्याचा प्रश्न आबांच्या पुढाकाराने मार्गी लागला.त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न आणि सहकार्य केले.शाळेसाठी ४ कोटीचा निधी आपल्या भागासाठी निर्माण करून दिला.माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक,उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष केले.या अगोदर जो सर्वसमावेशक विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही.आबा संघर्षातून उभे राहिलेत आणि संघर्ष करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे नेहमी देव उभा असतो.आबा मतदारसंघामध्ये रात्रंदिवस काम करतात.आबांना आम्ही वचन देतो की आता कितीही प्रलोभने आली तरी आम्ही भुलणार नाही.तुमच्या मागे या भागातील १०० टक्के लोकं उभी करण्याची जबाबदारी माझी आहे.
या प्रसंगी वाई शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.