मकरंद आबा पाटील चषक बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न
सातारा – महाराष्ट्र चेस असोशिएशन ( MCA ) यांच्या मान्यतेने नुकत्याच पार पडलेल्या व विश्वगंगा आयोजित रॅपिड रेटिंग चेस टूर्नामेंट 2025 ला राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभला. पारगाव खंडाळा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून दोनशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यात अनेक अंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेत पाच वर्षांपासून ते साठ वर्षांपर्यंत स्पर्धकांचा समावेश होता. नेटके आयोजन आणि अचूक नियोजनामुळे या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी आणि त्यांच्या पालकांनी आयोजकांना भेटून धन्यवाद दिले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मुख्य पंच – आंतरराष्ट्रीय पंच अथर्व निरंजन गोडबोले , उपमुख्यपंच – आंतरराष्ट्रीय पंच श्रद्धा विंचवेकर, पंच – आंतरराष्ट्रीय पंच पोर्णिमा उपळविकर , आंतरराष्ट्रीय पंच शार्दुल तपासे, फिडे पंच यशवंत पवार , फिडे पंच यश लोहाना , नॅशनल पंच गायत्री कुलकर्णी, नॅशनल पंच अपर्णा शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. सुरुवातीला जिल्हा चेस असोशिएनचे अध्यक्ष श्री. वसंत शिंदे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजन धादमे , श्री. मनोजकुमार तपासे, सौ. शैलजा तपासे, श्री. अशिष मालपाणी , श्री. दिपक राऊत , श्री. हलकुडे उपस्थित होते.
या स्पर्धेत एकुण एकशे चौवेचाळीस बक्षिसे प्रदान करण्यात आली असून यातील प्रथम पाच क्रमांकांचे गटनिहाय विजेते पुढील प्रमाणे आहेत –
प्रथम क्रमांक कशिष जैन, दुसरा क्रमांक ऋषिकेश कबनूरकर, तिसरा क्रमांक प्रथमेश सरला, चौथ्या क्रमाक श्रीराज भोसले,पाचवा क्रमांक हर्ष घाडगे यांनी प्राप्त केला. सर्व विजेत्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.
