स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई
(पोलीस अभिलेखावरील सराईत आरोपीकडुन घरफोडी, जबरी चोरी तसेच शेतीपंप चोरीचे सातारा जिल्हयातील एकुण १० गुन्हे उघड करून त्यांच्याकडुन ०४ तोळे ०६ ग्रम सोन्याचे दागिने ७,३६०००/रु, किंमतीचे ७० ग्रम चौदिचे दागिने २५,५००/- रु., मोटार सायकल ५५,०००/- रु., शेतीपंप ७०,०००/-कि. असा एकुण ८,८६,५००/- रूपर्वाचा मुद्देमाल हस्तगत)
श्री तुषार दोशी, पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सातारा जिल्हयातील शेतीपंप चोरी, घर फोडी, जबरी चोरींचे गुन्हे उघड करणेबाबत अरूण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा, साताराचे पोलीस उपनिरीक्षक, विश्वास शिगाडे यांचे एक तपास पथक तयार करून त्यांना वरील प्रमाणे गुन्हे उघड करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.
दिनांक १७/११/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक, अरूण देवकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कराड तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मौजे रेठरे बुद्रुक येथे एका घरामध्ये तसेच हॉटेलमध्ये चोरी केलेले आरोपी हे एका बारमध्ये येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली, त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास नमुद ठिकाणी जावुन त्यांना ताब्यात घेवुन पुढील कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकाने मौजे कोळेवाडी येथील बार नजीक सापळा लावून थांबुन राहिलो असता त्या ठिकाणी दोन इसम संशयीत रित्या फिरत असल्याचे आढळुन आले.
त्यावेळी कारवाईमधील पोलीस अंमलदार यांनी त्यांना नांव गांव विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देवून त्यांना पोलीस असल्याचा संशय आल्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी कराड तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ४८४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३३१ (४), ३०५ (अ), ३११ हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यांना या गुन्हयामध्ये अटक करून त्यांची मा. न्यायालयाकडून पोलीस कोठडी रिमांड घेवून आरोपींना विश्वासात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्यांनी कराड शहर, कराड तालुका, मसूर, कोयनानगर, पाटण या पोलीस स्टेशनच्या हडीमध्ये गुन्हे केले असल्याची कबुली दिलेली असून त्यांच्यकडून सदरचे गुन्हे करताना वापरलेले वाहन, हत्यार, तसेच गुन्हयातील एकुण ८,८६,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे.
श्री तुषार दोशी, पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, कराड तालुका पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक, रमेश गजें, रोहित फाणे, पोलीस उप निरीक्षक, विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, अजित कर्णे, अमोल माने, राकेश खांडके, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, हसन तडवी, शिवाजी भिसे, प्रवीण पवार, स्वप्नील दौंड, विजय निकम, संभाजी साळुंखे, आनंदा भोये तसेच महिला पोलीस अंमलदार अधिका बीर, शकुंतला सणस, तसेच कराड तालुका पोलीस ठाणेकडील स. फौ. नितीन येळवे, पोहवा सचिन निकम, दतात्रय तायशेटे, यांनी सदरची कारवाई केलेली आहे. कारवाईमधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री. तुषार दोशी, पोलीस अधिक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधिक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.




