माजी सरपंच कै.पांडुरंग महादेव पार्टे(भाऊ) यांच्या १२वा स्मृतिदिन
केळघर:जावळी तालुक्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रात कै. पांडुरंग पार्टे यांनी चांगले काम केले असून त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी ही त्यांची ही सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम ठेवली आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
येथील माजी सरपंच कै.पांडुरंग महादेव पार्टे(भाऊ) यांच्या १२व्या स्मृतिदिनामित्त आज येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी माजी गृहमंत्री आमदार जयंत पाटील, माजी सभापती बापूराव पार्टे, दत्तात्रय पार्टे, प्रमोद पार्टे, सचिन पार्टे, विनोद पार्टे, बाजीराव धनावडे, सुधीर पार्टे, सतीश पार्टे, दिलीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शशिकांत शिंदे व जयंत पाटील यांनी कै.पांडुरंग पार्टे यांना अभिवादन केले.
पार्टे कुटुंबीयांनी उपस्थितांचे स्वागत केले. सचिन पार्टे यांनी आभार मानले.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांनी भ्रमण ध्वनी वरून पार्टे कुटुंबियांशी संवाद साधला .
