माज उतरला, अखेर गौरव आहुजाला सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात
सातारा -पुण्यातील येरवडा परिसरात शास्त्रीनगर चौकामध्ये लघुशंका करून अश्लील कृत्य करणारा गौरव आहुजा अखेर पोलिसांना शरण आला आहे.सांस्कृतिक शहर असलेल्या पुणेनगरीत गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. एकीकडे पुणेकर या गुंडांना वैतागली आहे. अशातच एका श्रीमंत बापाच्या पोराने सिग्नलवर कार उभी करून रस्त्याच्या बाजूला लघुशंका केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अखेरीस रात्री उशिरा लघुशंका करणारा गौरव आहुजा हा कराड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा पठ्या स्टेशनला हजर होणार होता पण आधीत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.




