धन्वंतरी पतसंस्थेचे सीईओ श्री. संजय पवार यांना महाराष्ट्र सन्मान पुरस्कार प्रदान
राज्यात आदर्श असलेली “सहकार भूषण” धन्वंतरी नागरी सह. पतसंस्था मर्या., सातारा च्या माध्यमातून सहकार क्षेत्रात गेली पस्तीस वर्षे अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे सेवा करणारे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार यांच्या उत्तुंग कार्याची दखल घेवून त्यांना नुकताच “महाराष्ट्र सन्मान पुरस्कार-२०२४” हा पुरस्कार विविध मान्यवरांचे हस्ते देवून सन्मानित करण्यात आले.
श्री. विकास भोसले यांनी सदर समारंभाचे आयोजन केले होते. राज्याचे डिजीटल मिडीया संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजा माने यांचे हस्ते व सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले व इतर मान्यवरांचे उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना श्री. संजय पवार म्हणाले की, या पुरस्कारासाठी मला निवड पात्र समजल्याबददल संयोजकांचे आभार मानतो. पुरस्कार स्विकारताना अतिशय आनंद व अभिमान वाटतो. ज्या संस्थेत पहिल्या दिवसापासून काम करत असताना आजमितीस त्याच संस्थेचा भक्कम वटवृक्ष झाल्याचे समाधान वाटते अशा संस्थेस राज्याचे राज्यपाल यांनी महाराष्टातील प्रथम क्रमांकाची आदर्श पतसंस्था म्हणूनही गौरव केला आहे हेच माझया कार्याचे सार्थक झाल्यासारखे आहे. सुरूवातीला ५२५००/- भांडवलावर सुरू झालेल्या संस्थेकडे २२५ कोटीचे भांडवल आहे तसेच साठ कुटुंबे धन्वंतरीच्या वटवृक्षाखाली समाधानाने आपली प्रगती करत आहेत याबाबत मनोमन समाधान वाटते. धन्वंतरी पतसंस्थेने माझ्यासह अनेक सेवक, सभासदांना त्यांच्या आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक प्रगतीचा स्तर सतत उंचावत एक मोठी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले व्हा. चेअरमन डॉ. शिरीष भोईटे, संस्थापक संचालक कै. डॉ. क.श्री. लाहोटी, डॉ. अरविंद काळे, डॉ. कांत फडतरे, डॉ. शकील अत्तार, तसेच सर्व आजी माजी संचालक, सेवक यांचे अपार कष्ट व योगदानामुळेच संस्था नेत्रदिपक प्रगती करत आहे. संस्थेच्या सर्व शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यरत आहेत. संस्था सीबीएस प्रणालीव्दारे सर्व सभासद ग्राहकांना त्यांच्या सोईच्या सेवा देत आहे. गत पस्तीस वर्षात कार्य करत असताना आई वडील यांचे आशिर्वाद व पत्नी मुले यांची खंबीर साथ यामुळेच हे शक्य झाले असे मला वाटते. खरे तर हा पुरस्कार जरी मला मिळाला असला तरी ख-या अर्थाने याचे मानकरी आमची सर्व धन्वंतरी टिम व त्यांचे कुटुंबीय आहेत मी मात्र निमित्त आहे.
कोणतेही विधायक कार्य करताना विशाल दृष्टीकोन, सामाजिक हित ठेवून निस्वार्थी भावनेने काम केल्यास परमेश्वर नक्कीच आपणांला यश देतो याची आपणांस धन्वंतरी पतसंस्थेची प्रगती पाहून प्रचिती येईल. पुरस्कार दिल्याबददल आयोजकांचे त्यांनी आभार मानले.
संस्थेचे चेअरमन डॉ. रविंद्र भोसले, व्हा. चेअरमन डॉ. शिरीष भोईटे, डॉ. अरविंद काळे, डॉ. कांत फडतरे, डॉ. शकील अत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. सुनिल कोडगुले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. जयदिप चव्हाण, डॉ. सौ. सारीका मस्कर, डॉ. सौ. हर्षला बाबर, डॉ. नारायण तांबे, अॅड. सुर्यकांत देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीहरी डिंगणे, सर्व सेवक वर्ग, सभासद, हितचिंतक यांनी श्री. संजय पवार यांचे अभिनंदन केले.
