कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शेत शिवार » महाराष्ट्राला वैभव वाटावे असे कार्य दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून – घनश्याम पाटील

महाराष्ट्राला वैभव वाटावे असे कार्य दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून – घनश्याम पाटील

महाराष्ट्राला वैभव वाटावे असे कार्य दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून – घनश्याम पाटील

दीपलक्ष्मी दिनदर्शिका २०२६’चे प्रकाशन; सामाजिक प्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू

सातारा ( प्रतिनिधी):-महाराष्ट्राला वैभव वाटावे असे साहित्यिक उपक्रम,सामाजिक मेळावे ,सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रसाक्षरतेसाठी चित्र प्रदर्शने व आर्थिक क्षेत्रातील कार्य हे सर्व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. केवळ आर्थिक व्यवहार न करता समाजप्रबोधनाची जबाबदारीही पतसंस्थेने समर्थपणे निभावली आहे,” असे प्रतिपादन चपराक प्रकाशन, पुणेचे लेखक व प्रकाशक घनश्याम पाटील यांनी केले.

दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सातारा यांच्या वतीने आयोजित ‘दीपलक्ष्मी दिनदर्शिका २०२६’ या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. हा कार्यक्रम बुधवार, दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, शनिवार पेठ, सातारा येथे उत्साहात पार पडला.

या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्यवाह शिरीष चिटणीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके, लेखक श्रीराम नानल, VINSYS IT कंपनीचे सीईओ रवींद्र कामटे, पत्रकार अनिल वीर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला सौ. ज्योती पाटील यांचीही उपस्थिती लाभली.

प्रमुख पाहुणे शिरीष चिटणीस म्हणाले, “चपराक प्रकाशनचे प्रकाशक घनश्याम पाटील हे परखड विचार मांडणारे, समाजप्रबोधन करणारे व्यक्तिमत्त्व आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस हे त्यांना मुलासारखे मानतात. दीपलक्ष्मी पतसंस्थेची दिनदर्शिका ही इतरांपेक्षा वेगळी असून समाजोपयोगी उपक्रमांचा लेखाजोखा यातून दिसून येतो. वर्षभरात झालेले कार्यक्रम, उपक्रमांचे छायाचित्रण दिनदर्शिकेत असल्याने सामाजिक कार्याचा मागोवा घेता येतो.”

यावेळी बोलताना मुकुंद फडके म्हणाले, “आर्थिक नियोजनासाठी दिनदर्शिका अत्यंत महत्त्वाची असते. भविष्यात विविध विषयांवरील लेखांचा समावेश केल्यास ही दिनदर्शिका अधिक वाचनीय व संग्रहणीय ठरेल. दीपलक्ष्मी पतसंस्थेने दर्जेदार दिनदर्शिका सादर केली असून २०२६ सालाचे नियोजन सुलभ होईल.”

लेखक श्रीराम नानल यांनी, “सातारा शहराला नवा सामाजिक व सांस्कृतिक आयाम देण्याचे काम दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था सातत्याने करत आहे,” असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यवस्थापक विनायक भोसले हे कार्यक्रमाचे विनीत होते. कार्यक्रमास व्हॉइस चेअरमन आप्पासो शालगर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संचालक प्रदीप देशपांडे, शिवाजी हंबीरे, भगवान नारकर, अनिल चिटणीस, लाला बागवान, जगदीश खंडागळे, शिल्पा चिटणीस, सुनील बल्लाळ, हणमंत खुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय गौतम भोसले, विजय गव्हाळे, अभिनंदन मोरे, रवींद्र कळसकर, रविराज जाधव, शुभम बल्लाळ, अग्नेश शिंदे, उमेश वाधवानी, नासिर पटवेकर, सौ. पाटील, लक्ष्मण कदम, जनार्दन निपाने, प्रवीण सपकाळ, रसिका सुतार, अभिजीत देवरे यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले. सूत्रसंचालन विनायक भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीराम नानल यांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket