कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या महाराष्ट्र चेअरमनपदी प्रकाश गवळी यांची नियुक्ती

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या महाराष्ट्र चेअरमनपदी प्रकाश गवळी यांची नियुक्ती

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या महाराष्ट्र चेअरमनपदी प्रकाश गवळी यांची नियुक्ती

सातारा प्रतिनिधी-मेसर्स सावकर ट्रॅव्हल्सचे संचालक श्री. प्रकाश के. गवळी यांची ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस (AIMTC) च्या महाराष्ट्र राज्य चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती व्यवस्थापकीय समितीच्या सध्याच्या कार्यकाळासाठी म्हणजेच २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

मोटार वाहतूक उद्योगातील दीर्घ अनुभव, कौशल्य आणि रचनात्मक नेतृत्वाच्या आधारे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. AIMTC च्या वतीने पाठविण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात राज्यस्तरावरील वाहतूक व्यवसायाशी संबंधित प्रश्न, शासन व प्रशासनाशी समन्वय, सदस्यसंख्या वाढ, बैठकींचे आयोजन तसेच विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्याची महत्त्वाची जबाबदारी श्री. गवळी यांच्यावर राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

AIMTC चे नॅशनल प्रेसिडेंट डॉ. हरीश सबरवाल आणि चेअरमन डॉ. जी. आर. शनमुगअप्पा यांनी श्री. गवळी यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील वाहतूक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील वाहतूक व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, श्री. गवळी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket