Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » महाराष्ट्रातील भाविकांच्या गाडीचा मध्यप्रदेश मध्ये अपघात, 2 डॉक्टरांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

महाराष्ट्रातील भाविकांच्या गाडीचा मध्यप्रदेश मध्ये अपघात, 2 डॉक्टरांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

महाराष्ट्रातील भाविकांच्या गाडीचा मध्यप्रदेश मध्ये अपघात, 2 डॉक्टरांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

शिवपुरी (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील शिवपुरी महामार्गावर झालेल्या एका भीषण कार अपघातात डॉ.तन्वी आचार्य आणि डॉ.नीलम पंडित या दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यापासून घसरून पुलावरून पडल्याने हा अपघात भीषण अपघात घडला आहे. सगळे प्रवासी 10 दिवसापूर्वी तीर्थ यात्रेला निघाले होते. दरम्यान, अयोध्यामध्ये दर्शन घेतल्यानंतर सगळे भाविक उज्जैनच्या दिशेने उज्जैन महाकालेश्वर मंदिराकडे प्रवास करत होते. डॉ. अतुल आचार्य, डॉ. उदय जोशी, डॉ. सुबोध पंडित आणि डॉ. सीमा जोशी हे चार डॉक्टर अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात डॉ. तन्वी आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला असून डॉ. नीलम पंडित यांचा रुग्णालयात नेत असतांना मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कोलारस पोलीस ठाण्याचे पोलिस घटना स्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात नेले. सकाळी आठ वाजता हा अपघात झाला आहे. सगळे प्रवासी मुंबईतील असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर सज्ज! ‘महापर्यटन महोत्सवा’चा भव्य धमाका; वेण्णा तलावात लेझर शो, कच्छच्या धर्तीवर टेंट सिटी

Post Views: 164 महाबळेश्वर सज्ज! ‘महापर्यटन महोत्सवा’चा भव्य धमाका; वेण्णा तलावात लेझर शो, कच्छच्या धर्तीवर टेंट सिटी महाबळेश्वर(राजेश सोंडकर )निसर्गरम्य

Live Cricket