महापुरुषांची अवहेलना…. उदयनराजेची कठोर भूमिका
राज्य सरकारला सुनविले खडेबोल, मोक्का कायद्याचा आग्रह
सातारा – इतिहासाचा कोणताही गंध नसणारी मंडळी आता इतिहास संशोधक असल्यासारखे बरळत आहेत त्यामुळे महापुरुषांच्या पराक्रमाची एक प्रकारे ते अवहेलना करीत आहेत त्यांच्या या बालिश वृत्तीमुळे समाज समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे अशा प्रवृत्तींना कायमचा धडा शिकवणे गरजेचे बनले आहे सिने अभिनेता राहुल सोलापूरकर व स्वतःला पत्रकार म्हणून मिरवणारा प्रशांत कोरटकर ही मंडळी आता जाती-जातीत धर्माधर्मात वाद वाढवीत आहेत औरंगजेबाची कबर आणि वाघ्या कुत्र्यावरून समाजामध्ये तेढ निर्माण करणारे व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर करणाऱ्या या वृत्तीमुळे समाजाचा सामाजिक सलोखा बिघडत आहे याबाबत छत्रपती घराण्याचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारलाही खडे बोल सुनावले आहेत याबाबत देशाचे गृहमंत्री नामदार अमित शहा यांना समक्ष भेटून आपल्या तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत महापुरुषाबद्दल विकृतपणे बोलणाऱ्या व्यक्तींना या पुढील काळात मोक्कासारख्या कायदा लावून त्यांच्यावर कारवाई व्हावी ही अपेक्षा त्यांनी या भेटीत व्यक्त केली याविषयी श्रीरंग काटेकर सातारा यांनी घेतलेला एक आढावा…
छत्रपती शिवरायांचा शौर्य आणि पराक्रमाचा इतिहासाला गालबोट लावण्याचा केविलवाणी प्रयत्न प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांच्याकडून केला जात आहे धार्मिक व जातीय तेढ निर्माण करून समाजा समाजामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र या शकुनी मामा कडून केले जात आहे सामाजिक द्वेष पसरणारे व जातीय संघर्ष उभा करणारे प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर हे धर्माने हिंदू असूनही मोघलांची भाषा ते बोलत आहेत अशा मंडळींची विकृत प्रवृत्ती वेळीच ठेचून काढली पाहिजे महापुरुषांच्या धैर्य साहस व त्यांच्या कर्तुत्वाला कलंक लावणाऱ्या त्या प्रवृत्ती महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला येतातच कसे छत्रपती शिवराया व राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी राजे हे खरे तर सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान व प्रेरणास्थान असताना प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांनी विकृत वैचारिकतेचे केलेले मतप्रदर्शन याचा जाब आता सर्वांनीच विचारायला हवा समाजाच्या भावना भडकून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या या वृत्ती पाठीमागील शक्तीचाही शोध आता घेण्याची वेळ आली आहे शिवछत्रपतींचे तेरावे वंशज सातारचे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबत कठोर भूमिका घेतली आहे त्यांनी याबाबत आपला संताप ही व्यक्त केला आहे दिल्ली भेटीत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी याबाबत प्रदीर्घ चर्चा केली असून महापुरुषांच्या अवमान व अवहेलना बाबत कोणतीही तडजोड यापुढे होता कामा नये ही आपली स्पष्ट आणि परखड भूमिका त्यांनी मांडले आहे अर्थात प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर हे समाजाला लागलेली एक वाळवी आहे ती वेळीच दूर केली नाही तर ही विषवल्ली संपूर्ण समाजाला पूर्णपणे पोखरून टाकेल आणि मग शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास काळाच्या पडद्याआड होईल हा भविष्यातील धोका ओळखून शकुनी मामाच्या भूमिका बजावणाऱ्या वृत्तीवर वेळीच घाला घालण्याची नितांत गरज आहे महापुरुषांचा अवमान यापुढील काळात कोणालाही करता येणार नाही अशा पद्धतीचे कायदा देशात या पुढील काळात निर्माण होणे गरजेचे आहे
– वाद विवाद उभा करून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवणाऱ्या वाचाळ वीरांना इतिहासाचे काही देणे घेणे नसते स्वतःला पत्रकार समजणारी प्रशांत कोरटकर व सिनेअभिनेता राहुल सोलापूरकर यांचे बालिश वर्तनामुळे सामाजिक ऐक्य हे धोक्यात आले आहे अशा प्रवृत्ती राज्यात पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून कठोर शिक्षेची तरतूद होणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे इतिहासाची छेडछाड होणार नाही याचीही दक्षता यापुढे काळात राज्य सरकारने घेणे आवश्यक आहे.
जेम्स लेन प्रकरणाचे वादळाने ढवळून निघालेले शिवचरित्रावर पुन्हा प्रशांत कोरडकर व राहुल सोलापूरकर यांनी फुंकर घालून शिवरायांचा राजमाता जिजाऊ संभाजी राजे यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे स्वराज्यासाठी व रयतेच्या कल्याणासाठी झटणारे शिवरायांविषयी बोलण्याची धाडस येते कुठून हाच मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे स्वतःला इतिहास तज्ञ संशोधक असल्याचा आव आणीत प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर याचा बोलविता धनी कोण हे ही शोधणे आता गरजेचे आहे.
श्रीरंग काटेकर सातारा
