Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वर अग्निशमन दल सज्ज : आगीच्या भडक्यातही होणार प्रभावी बचावकार्य.

महाबळेश्वर अग्निशमन दल सज्ज : आगीच्या भडक्यातही होणार प्रभावी बचावकार्य.

महाबळेश्वर अग्निशमन दल सज्ज : आगीच्या भडक्यातही होणार प्रभावी बचावकार्य.

महाबळेश्वर : महाबळेश्वर आणि परिसरात कुठेही आग लागल्यास, अग्निशमन दलाचे जवान आता अधिक सक्षमपणे बचावकार्य करू शकणार आहेत. सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून महाबळेश्वर नगरपरिषदेला अत्याधुनिक ‘प्रॉक्सिमिटी सूट’ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सूटमुळे जवानांना आगीच्या भडक्यातही सुरक्षितपणे बचावकार्य करणे शक्य होणार आहे. मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या प्रांगणात या सूटचे आणि इतर अत्याधुनिक उपकरणांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

आगीत अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ‘फायर प्रॉक्सिमिटी सूट’ अत्यंत उपयुक्त आहेत. महाबळेश्वर नगरपरिषदेला एकूण सहा ‘फायर सूट’ मिळाले आहेत. हे सूट परिधान करून अग्निशमन दलाचे जवान 60 अंश सेल्सिअस तापमानातही काम करू शकतात. या सूटमध्ये हेल्मेट, हातमोजे, शर्ट, पॅन्ट आणि गमबूट यांचा समावेश आहे. यासोबतच लोखंड कापण्यासाठी इलेक्ट्रिक कटर, पंप, ऑक्सिजन सिलिंडर, फायर एक्स्टिंग्विशर यांसारख्या आधुनिक उपकरणांचे देखील प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्यासह आबाजी ढोबळे (मुख्य लिपिक), मुरलीधर धायगुडे (नगर अभियंता), अमित माने (कर निरीक्षक), सचिन कदम, प्रशांत म्हस्के (लेखापाल), प्रमोद कुंभार (स्वच्छता निरीक्षक) आणि अग्निशमन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

महाबळेश्वर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला अत्याधुनिक आणि दर्जेदार उपकरणे मिळाल्यामुळे अग्निशमन दलाचे कर्मचारी आता निर्भयपणे आणि सक्षमतेने आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत काम करू शकतील,” असे प्रतिपादन प्रशासक आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी केले.या उपकरणांमुळे महाबळेश्वर आणि परिसरात आग लागल्यास नागरिकांना जलद आणि प्रभावी मदत मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 11 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket