Home » राज्य » प्रशासकीय » महाबळेश्वरचे राजकारण तापले! नगराध्यक्षपदी कोण? उत्सुकता शिगेला

महाबळेश्वरचे राजकारण तापले! नगराध्यक्षपदी कोण? उत्सुकता शिगेला

महाबळेश्वरचे राजकारण तापले! नगराध्यक्षपदी कोण? उत्सुकता शिगेला 

महाबळेश्वर: थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय उष्णता शिगेला पोहोचली आहे! आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवक अशा एकूण 21 जागांवर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यंदा नगराध्यक्षपदाची थेट जनतेतून निवडणूक होणार असल्याने मतदारांना दोन नगरसेवकांसह नगराध्यक्षासाठी असे तीन मतांचा हक्क मिळणार आहे, ज्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.

 नगराध्यक्ष पदासाठी चुरशीची लढत

शहरवासीयांना नेतृत्वाचा थेट कौल देण्याचा हक्क मिळाल्याने नगराध्यक्षपदासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. सध्या चर्चेत असलेली प्रमुख नावे खालीलप्रमाणे आहेत:

▪️कुमार शिंदे

▪️डी.एम. बावळेकर

▪️नासिर मुलानी

▪️सुनील शिंदे

विशाल तोशनिवाल

यापैकी कोण कोणत्या पक्षातून लढणार किंवा कोण अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार, याबाबतची राजकीय गणिते अद्याप सुरू आहेत.

🔹 प्रभागनिहाय इच्छूक उमेदवारांची चर्चा:

नगरसेवकपदासाठी प्रत्येक प्रभागात जोरदार तयारी सुरू आहे. आरक्षणानुसार चर्चेत असलेल्या संभाव्य उमेदवारांची प्रभागनिहाय यादी खालीलप्रमाणे आहे:

प्रभाग क्रमांक आरक्षित गट इच्छूक उमेदवार (चर्चेतील नावे)

प्रभाग: १

          सर्वसाधारण: युसुफ शेख (माजी नगराध्यक्ष), शंकर ढेबे, अजर बडाने, राजू नालबंद, सुनील आखाडे

सर्वसाधारण (महिला): विद्या शरद बावळेकर, आशा सुनिल ढेबे, झीनत याकुब चौगुले

प्रभाग: २

         ओबीसी सर्वसाधारण:प्रशांत आखाडे, सत्तार बडाने, किरण काळे, रवी कुंभारदरे, संतोष आखाडे:

महिला आरक्षण: संगीता दत्तात्रय वाडकर, सोनाली रोहित बांदल, शांता सुरेश आखाडे

प्रभाग: ३

 महिला आरक्षण: विमलताई पार्टे, ज्योतीताई वागदरे, पूजा उतेकर

सर्वसाधारण: विशाल तोष्णीवाल, रवींद्र कुंभारदरे, हेमंत साळवी, प्रवीण जिमन

प्रभाग: ४

    अनुसूचित जाती (SC): विलास काळे, आकाश साळुंखे, कुमार शिंदे, ऋषी वायदंडे, उमेश रोकडे

महिला आरक्षण: विमलताई ओंबळे, वंदना गणेश ढेबे, विमल ताई बिरामणे

प्रभाग: ५

 महिला आरक्षण:अपर्णा सलागरे, प्रभा विजय नायडू, स्मिता सुनील पाटील

सर्वसाधारण: संजय जंगम, सुनील साळुंखे, सैफ सज्जाद वारुणकर

प्रभाग: ६ 

 सर्वसाधारण: गणेश सपकाळ, आबा शिंदे, दुर्वेश प्रभाळे, सचिन शिर्के, समीर सुतार

अनुसूचित जमाती (ST): महिला उषा कोंडके, निता आकाश झाडे, सौ. खामकर

प्रभाग: ७

  सर्वसाधारण: नासिर मुलानी, सलीम बागवान, इकबाल वलगे

ओबीसी महिला:अफजल वलगे यांची पत्नी, अल्ताफ मानकर यांची पत्नी

प्रभाग: ८

सर्वसाधारण: बंडूशेठ कुंभारदरे, राहुल पिसाळ, मुबारक शेख

अनुसूचित जाती (SC) महिला: स्वप्नाली कुमार शिंदे (माजी नगराध्यक्ष), उषा गोरख शिंदे, स्नेहा आकाश साळुंखे

प्रभाग :९

 ओबीसी महिला: संगीता प्रकाश हिरवे, आफरीन वरुणकर, रेश्मा किरण ढेबे, संगीता गोंदकर

सर्वसाधारण:अफजल सुतार, मोजम नालबंद, आशिष चोरगे

प्रभाग: १०

 सर्वसाधारण: रोहित ढेबे, मनीष मोहिते, संदीप कोंढाळकर

ओबीसी महिला:नीलम गणेश आखाडे, सुनिता संदीप आखाडे, अश्विनी अशोक ढेबे, सुनिता दत्तात्रय ढेबे

गटबाजी आणि जनसंपर्काचे महत्त्व

महाबळेश्वरच्या राजकारणात गटबाजीची परंपरा असली तरी, यावेळी पक्षीय चिन्हापेक्षा उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व आणि जनसंपर्क निर्णायक ठरणार आहे. स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी आणि पर्यटन व्यवस्थापन हे महत्त्वाचे मुद्दे मतदारांच्या मनात आहेत. त्यामुळे प्रत्येक इच्छूक उमेदवार याच समस्यांवर प्रचाराची दिशा ठरवताना दिसत आहे.

तिकीट न मिळाल्यास अनेक नेते अपक्ष म्हणून लढण्याचा पवित्रा घेत असल्याने पक्षांमधील अंतर्गत मतभेद आणि गोंधळामुळे निवडणुकीची समीकरणे दररोज बदलण्याची शक्यता आहे. महाबळेश्वर नगरपरिषदेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, कोणाविरुद्ध कोण आणि मतदारांचा नेमका मूड काय, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Live Cricket