गट गण आरक्षणामुळे महाबळेश्वरच्या राजकारणात बदल — मंत्री मकरंद आबा पाटील नव्या चेहऱ्यांना संधी देणार का?
सातारा (अली मुजावर): जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीत महाबळेश्वर तालुक्यात मोठा बदल घडला आहे. भिलार गटात अनुसूचित जमाती व तळदेव गटात सर्वसाधारण आरक्षण पडल्याने तालुक्याच्या राजकारणाचे समीकरणच बदलले आहे.
भिलार पंचायत समिती गणात सर्वसाधारण महिला, मेटगुताड गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तळदेव गणात सर्वसाधारण, तर कुंभरोशी गणात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. या बदलामुळे अनेक जुन्या नेत्यांच्या गणितात फेरबदल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंचायत समितीचे सभापतीपद इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने संजूबाबा गायकवाड यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
तळदेव आणि कुंभरोशी परिसरात कै.बाळासाहेब भिलारे यांचा प्रभाव कायम असून, या भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या पार्श्वभूमीवर युवा नेतृत्व नितीनदादा भिलारे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास, त्यांना सहज विजय मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. कै.बाळासाहेब भिलारे यांचा राजकीय वसा — युवा नेतृत्व नितीन भिलारे यांच्या रूपाने पुढे; जिल्हा परिषदेस संधीची कार्यकर्त्यांची मागणी होत आहे.
मंत्री मकरंद आबा पाटील यांनी आतापर्यंत महाबळेश्वर तालुक्याचे सूत्रे बाळासाहेब भिलारे यांच्या हाती दिले होती. बाळासाहेब भिलारे यांच्या निधनानंतर आता त्यांच्या विश्वासातील शिलेदारांमध्ये राजेंद्र राजपुरे आणि संजूबाबा गायकवाड यांचा समावेश असल्याने, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का? — हा प्रश्न तालुक्यातील जनतेत चर्चेचा विषय ठरला आहे.
महाबळेश्वर तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांची बीजे रोवली जात असून, आगामी निवडणुकीत कोणाचा चेहरा पुढे येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
