महाबळेश्वरच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ नासिर मुलाणी; सत्ता बदलाचे खरे गेमचेंजर!
महाबळेश्वर : स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलणारे “गेमचेंजर” नासिर मुलाणी
प्रतिनिधी :महाबळेश्वर: महाबळेश्वरची नगरपालिका राजकारणापासून कधीच दूर नसते. प्रत्येक पाच वर्षांनी येथे सत्ता बदलाची नाट्यमयता, गटबाजी, बंडखोरी आणि किंगमेकरचा उदय असे अनेक टप्पे पाहायला मिळतात. या साऱ्या राजकीय प्रवाहात गेल्या दशकभरात सतत निर्णायक ठरणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे नासिर मुलाणी. ज्यांना स्थानिक पातळीवर महाबळेश्वरचे गेमचेंजर म्हणून ओळखले जाते.
२०११ मध्ये डी.एम. बावळेकर नगराध्यक्ष असताना पालिकेवर बावळेकर गटाची मजबूत सत्ता होती. त्याचवेळी बावळेकर गटातून नासिर मुलाणी निवडून आले होते. बावळेकर यांनी केलेले आश्वासन नगराध्यक्ष पद त्यांना मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, हे पद न मिळाल्याने मुलाणी यांच्या नाराजीला धार आली. या घडामोडींचा फायदा घेत, “किंगमेकर” म्हणून प्रसिध्द होऊ लागलेल्या कुमार शिंदे यांनी मुलाणी यांच्या पाठिशी उभे राहून बावळेकर गटाचे सत्तेवरील वर्चस्व खाली खेचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या घटनेनंतर महाबळेश्वरच्या राजकारणात नासिर मुलाणी यांचे वजन अधिकच वाढले.
२०१६ मध्ये प्रथमच थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वप्नाली शिंदे मैदानात उतरत होत्या. या निर्णायक लढतीत पुन्हा एकदा नासिर मुलाणींच्या राजकीय गणिताची कमाल दिसून आली. जुबेदा मुलाणी नगरसेवक म्हणून नासिर मुलाणी याची पत्नी निवडून आल्या राष्ट्रवादीने नासिर मुलाणी यांना स्वीकृत नगरसेवक पद बहाल केले त्यांनी निर्माण केलेली पकड पक्कीच होती; त्यातच त्यांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने राजकीय समीकरण पूर्णपणे झुकवणारी ठरली. परिणामी राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा पालिकेत स्थिरावली.
मात्र महाबळेश्वरचे राजकारण कधीच एकाच रेषेत चालत नाही. काही वर्षांत स्वप्नाली शिंदे आणि कुमार शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून नवा राजकीय अध्याय सुरू केला. आता आगामी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) तर्फे कुमार शिंदे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीने सुनील शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना उमेदवारी दिली आहे. याचवेळी नासिर मुलाणी यांना तिकीट न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादीविरोधात बंडाचे हत्यार उगारले आहे.
स्थानिक राजकारणात मात्र एक गोष्ट सातत्याने जाणवते नासिर मुलाणी ज्या पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा देतात, त्यांचा नगराध्यक्ष पदावर विजय निश्चित असल्याचे आतापर्यंतचे समीकरण दाखवते. त्यांच्या भूमिकेमुळेच महाबळेश्वरमध्ये उमेदवारांपेक्षा मुलाणी यांची भूमिका, त्यांच्या राजकीय हालचाली आणि त्यांचा पाठिंबा कुणाला आहे, का स्वता अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदाचे दावेदार राहणार याकडे सर्वात जास्त लक्ष लागलेले असते.यामुळेच आजही नासिर मुलाणी हे महाबळेश्वरच्या संपूर्ण राजकीय पटावर निर्णायक, प्रभावी आणि सत्तेची दिशा बदलणारे खरे “गेमचेंजर” म्हणून ओळखले जातात.




