महाबळेश्वरात गुरुवारी जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम
महाबळेश्वर : जागतिक महिला दिनानिमित्त महाबळेश्वर विधी सेवा समिती व महाबळेश्वर तालुका वकिल संघ, महाबी फाऊंडेशन, महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागर स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुरुवार, दि. ७ रोजी सकाळी ९.३० वाजता येथील माखरिया गार्डनमध्ये कार्यक्रम होणार आहे.
महाबळेश्वर विधी सेवा समिती व महाबळेश्वर तालुका वकिल संघ, महाबी फाऊंडेशन यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून कायदेविषयक, शैक्षणिक, आरोग्यविषयक जनजागृती शिबिर व महाबी फाऊंडेशनतर्फे ‘जागर स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमांतर्गत कतृर्त्ववान महिलांचा सन्मान सोहळा होणार आहे. दिवाणी व फौजदार न्यायालयाचे न्यायाधीश ए. डी. मारगोडे यांच्या अध्यक्षतेखाली व महाबळेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, तहसीलदार तेजस्विनी पाटील, पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, तालुका विधी सेवा समितीचे सदस्य सचिव अरुण मरभळ, महाबळेश्वर तालुका वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार दस्तुरे, महाबी फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रदीप मोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती महाबी फाऊंडेशनने दिली.