महाबळेश्वर तालुक्यातील मौजे गोरोशी गावा जवळ वाहतुकीच्या रस्त्याच्या मोरीला पङले भगदाङ
सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळिच दखल घेउन रस्ता व मोरीच्या दुरुस्तीची मागणी.
पार्वतीपूर पार: महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागातील दुर्गम ग्रामिण भागाकङे जाणार्या मौजे पार ते दुधगाव दरम्यान गोरोशी गावालगत मुख्य वाहतुकिच्या रस्त्याची दुरावस्था झालेली असुन पावसाळी पाणी वाहुन जाण्या साठी बांधलेल्या मोरीच्या कामासाठी टाकलेल्या सिमेंटच्या मोठ्या पाईपला देखिल भगदाङ पङल्यामुळे वाहनांच्या दळण वळणाला धोका निर्माण झाला आहे.
यामुळे कोणत्याही वेळेस दुर्घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.तसेच वाहतुक देखिल ठप्प होउन लोकांचे जनजिवन विस्कळीत होउन उदभवणार्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
. त्यातच पावसाळा एक महिण्यावर येउन ठेपला असल्याने या भागातील ग्रामिण जनतेला अधिक संकटांना सामोरे जावे लागेल याची वेळिच दखल घेउन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी त्वरीत मौजे गोरोशी गावाजवळ रहदारीच्या मुख्य रस्त्याचे नव्याने ङांबरीकरण करुन दुरावस्था व भगदाङ पङलेल्या मोरीचे नव्याने बांधकाम करुन ग्रामिण भागातील जनतेची होणारी गैर सोय दुर करावी अशी चर्चा ग्रामिण अतिदुर्गम भागातील नागरिकांकङुन होत आहे.