महाबळेश्वर तालुक्यातील शिवसागर जलाशयात पोहायला गेलेल्या दोन मुलीचा बुडून मृत्यू
महाबळेश्वर – महाबळेश्वर पासून ४० किलोमीटर अतरावर असलेल्या शिवसागर जलाशयात वाळणे गावातील तीन मुली पोहायला गेल्या असताना दोन मुलीचा दुर्दैवी मृत्यु सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय १३) वाळणे ,सोनाक्षी तानाजी कदम ( वय १३) वाळणे यामध्ये तीसरी मुलगी सृष्टी सुनिल नलावडे वय १३ हीची प्रकृती गंभीर असून महाबळेश्वर ग्रामीण रूग्णालय मध्ये अधिक उपचार घेत आहे.
महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की सदर घटना सकाळी साडाबारा वाजताच्या सुमारास वाळणे या गावात घडली असून तापोळा परिसरात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे दुरध्वनी वरून माहिती कळविण्यात उशीर झाला असून एका महिलेने आकल्पे या गावातून आपल्या पतीस गावात घडलेली माहिती दिल्यामुळे महाबळेश्वर पोलिस ठाण्यात एक वाजल्याच्या सुमारास महाबळेश्वर पोलिस ठाण्यात घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार संतोष शेलार घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता दोन मुलीचा मृत्यू झालेला होता.दोन मृत झालेल्या सोनक्षी रामचंद्र सुतार (वय १३) वाळणे ,सोनीक्षी तानाजी कदम ( वय १३) वाळणे झालेल्या मुली सात वाजलेच्या सुमारास महाबळेश्वर ग्रामीण रूग्णालय शवविछेदनासाठी दाखल करण्यात आल्या या वेळी महाबळेश्वर ग्रामीण रूग्णालयात वाळणे व परिसरातील स्थानिक नागरिकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती
महाबळेश्वर पोलिस ठाण्यात शुभांगी सुनिल तांबे वय-43 खबरी जबाब दिला की आशा सेविका वाळणे गावात गेले 7 वर्षापासुन नोकरी करीत आहे.रविवार रोजी सकाळी मी माझे घरी असताना माझी मुलगी हर्षदा सुनिल तांबे हीचे बरोबर आमचे गावातील तिच्या चार मैत्रीनी आर्या दिपक नलावडे (वय 12 )सुष्ठी सुनिल नलावडे (वय 13) सोनाक्षी तानाजी कदम (वय 12 )सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय 12 )सर्व रा वाळणे महाबळेश्वर या अभ्यास करण्यासाठी माझ्या मुलीकडे सोबत आल्या होत्या अभ्यास करीत असताना दुपारी 12.30 वा. सुमारास मुलिंचा आवाज बंद झालेचा एकु आलेने मी काय झाले पाहण्यासाठी बाहेर आले त्यावेळी आमचे घराजवळ असले धरणाचे दिशेणे मुलिंचा आरडा ओरडा केल्याचा आवाज ऐकु आल्याने मी आवाजाच्या दिशेने धरणाकडे गेले त्या वेळी आमच्या घराकडे अभ्यास करणेकरीता आलेल्या चारही मुली पाण्यामध्ये बुडत असलेल्या दिसलेने मी पळत जावुन धरणाचे पाण्यात उडी मारली व त्या पैकी आर्या दिपक नलावडे वर्ष हीस बुडत असताना पाण्यातुन बाहेर काढले व पुन्हा पाण्यात उडी मारली व सुष्ठी सुनिल नलावडे हीस बाहेर काढले व त्या नंतर पाण्यात उडी मारली व सोनाक्षी रामचंद्र सुतार हीस बाहेर काढले व लोकांना आरडाओरडा केल्याने धरणात असले मच्छीमार लोकांनी बोटीनी येवुन त्यानंतर सोनाक्षी तानाजी कदम हीस पाण्यातुन बाहेर काढले त्यांचे त्यापैकी सोनाक्षी तानाजी कदम वय-12 वर्ष, सोनाक्षी रामचंद्र सुतार वय 12 वर्ष ह्या मयत झाल्या सृष्टी सुनिल नलावडे (वय १३ )हीची प्रकृती गंभीर असून महाबळेश्वर ग्रामीण रूग्णालय मध्ये अधिक उपचार घेत आहे.
महाबळेश्वर पोलिस ठाण्यातून मिळत असून पुढील तपास पोलिस निरिक्षक यशवंत नलावडे याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपपोलिस निरिक्षक रऊफ इनामदार व हवालदार संतोष शेलार करीत आहे.
