महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक २०२५: नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याचा कालावधी सुरू! आज एकाही उमेदवाराचा अर्ज मागे नाही.
महाबळेश्वर:महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने, नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, वैध नामनिर्देशन पत्रांची यादी नमुना ४ अ मध्ये नगरपरिषद कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी आता नामनिर्देशन पत्रे (उमेदवारी अर्ज) मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा सुरू झाला आहे.
अर्ज मागे घेण्याचे वेळापत्रक आणि ठिकाण उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीचे अर्ज महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद कार्यालय येथे स्वीकारले जात आहेत.
अपील नसलेल्या उमेदवारांसाठी अंतिम मुदत:
कालावधी १९/११/२०२५ ते २१/११/२०२५
▪️वेळ: दुपारी ३:०० वाजेपर्यंत
छाननी निकालाविरुद्ध अपील असलेल्या उमेदवारांसाठी मुदत:
▪️कालावधी: २१/११/२०२५ ते २५/११/२०२५
▪️टीप:वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधीशाकडे अपील करण्याची सोय आहे. अपिलाचा निर्णय ज्या तारखेस होईल, त्या तारखे नंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी, मात्र २५/११/२०२५ पर्यंत नामनिर्देशन मागे घेता येतील. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्याचे प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आजची स्थिती (१९/११/२०२५)
आज, दिनांक १९/११/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होती. या वेळेत एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. याचा अर्थ, पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतलेली नाही.
या कालावधीनंतर निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल, ज्यामुळे महाबळेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.




