महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक २०२५: नामनिर्देशन पत्र दाखल करण्याकामी मार्गदर्शन सत्र संपन्न
महाबळेश्वर: महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, नामनिर्देशन पत्र (Nomination Form) दाखल करण्याच्या प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मा. निवडणूक निर्णय अधिकारी, महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद यांच्या कार्यालयाच्या वतीने ही बैठक शनिवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता खादी ग्रामोद्योग सभागृह, महाबळेश्वर येथे यशस्वीरीत्या पार पडली.
या मार्गदर्शन सत्रामध्ये सचिन मस्के, निवडणूक निर्णय अधिकारी, आणि योगेश पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपस्थितांना नामनिर्देशनपत्रासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींबद्दल सादरीकरणासह (Presentation) सविस्तर माहिती दिली.
मार्गदर्शनाचे मुख्य मुद्दे:
नामनिर्देशन अर्ज (Nomination Application): अर्ज भरताना पाळावयाच्या सर्वसाधारण सूचना आणि महत्त्वाचे नियम.
आवश्यक कागदपत्रे:नामनिर्देशन पत्र दाखल करताना सादर करावी लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी आणि त्यासंबंधीची माहिती.
▪️आदर्श आचारसंहिता (Model Code of Conduct):* निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन कसे करावे, याबद्दल मार्गदर्शन.
यावेळी, उपस्थितांच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासंबंधीच्या विविध शंकांचे योग्य निरसन करण्यात आले. हे सत्र निवडणुकीच्या प्रक्रियेची माहिती आणि पारदर्शकता वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरले.
सदर मार्गदर्शन सत्रासाठी नगरपरिषद कर्मचारी, सर्व राजकीय पक्षांचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार, तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.




