महाबळेश्वरच्या नगराध्यक्षपदी सुनील शिंदे विराजमान; खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत दिमाखदार पदग्रहण सोहळा
महाबळेश्वर: पर्यटननगरी महाबळेश्वरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. श्री. सुनील शिंदे यांनी खासदार नितीन काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी समर्थकांनी केलेली फटाक्यांच्या आवाजाने नगरपालिका परिसर दुमदुमून गेला.
जंगी स्वागत आणि शिवरायांना अभिवादन
कार्यक्रमाची सुरुवात महाबळेश्वर नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर करण्यात आली. खासदार नितीनकाका पाटील, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि सर्व नगरसेवकांचे आगमन होताच फटाक्यांच्या अतिशबाजीमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराजांच्या जयघोषाने परिसर भारावून गेला होता. अभिवादनानंतर सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधी आपल्या दालनात दाखल झाले.
नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित स्वागत समारंभात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये प्रामुख्याने:
खासदार नितीन काका पाटील (प्रमुख पाहुणे),राजुशेठ राजपुरे (संचालक जिल्हा बँक),संजुबाबा गायकवाङ(मा.सभापती पंचायत समिती महाबळेश्वर), योगेश पाटील (मुख्याधिकारी, महाबळेश्वर नगरपरिषद)तसेच महाबळेश्वर नगरीतील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आणि सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
अपक्षांची अनुपस्थिती ठरली चर्चेचा विषय
संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडत असतानाच, राजकीय वर्तुळात एका गोष्टीची मोठी चर्चा रंगली होती. या महत्त्वाच्या पदग्रहण सोहळ्याकडे अपक्ष नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे शहरात विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
लोकहिताला प्राधान्य देणार: सुनील शिंदे
पदभार स्वीकारल्यानंतर सुनील शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाबळेश्वरच्या विकासासाठी आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी आपण कटिबद्ध असून, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याला आपले पहिले प्राधान्य असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. खासदार नितीन पाटील यांनीही नवनिर्वाचित नगराध्यक्षांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




