महाबळेश्वर आगारात संविधान दिन साजरा
केळघर, ता:२६:आज महाबळेश्वर आगारात संविधान दिन साजरा करण्यात आला तसेच २६/११च्या मुंबई वर झालेल्या हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी ,हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी आगार व्यवस्थापक महेश जाधव, सहायक वाहतूक अधीक्षक प्राजक्ता मोहिते, आगार लेखाकार महेश शिंदे, वरिष्ठ लिपिक विकास कांबळे,अजित जमदाडे, वाहतूक नियंत्रक संजय निकम ,विठ्ठल चव्हाण ,राहुल कुंभार, संतोष ढेबे यांच्यासह चालक, वाहक कर्मचारी उपस्थित होते.सहायक वाहतूक अधीक्षक मोहिते यांच्यासह उपस्थित आधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन केले.२६/११च्या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस अधिकारी व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
महाबळेश्वर:संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकाचे वाचन करताना महेश जाधव. समवेत प्राजक्ता मोहिते, महेश शिंदे व कर्मचारी.




