लोणंद -लोणंद येथे १५ फेब्रुवारी पासून डॉक्टर नितीन सावंत विचारमंचच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या ‘शरद कृषी महोत्सव’ च्या पार्श्वभूमीवर लोणंद पालखीतळावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून व मंडपाची पायाभरणी करून या राज्यस्तरीय प्रदर्शनाच्या तयारीला सुरुवात करण्यात आली.यावेळेस डॉक्टर नितीन सावंत यांनी सर्वांनी भरभरुन प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले, यावेळेस म्हस्कू आण्णा शेळके, रघुनाथ शेळके, एडव्होकेट हेमंत खरात, राजू इनामदार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास राजेंद्र डोईफोडे, संदीप शेळके, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या या कृषी प्रदर्शनात दि १५रोजी कृषी दिंडी काढून सुरुवात करण्यात येईल. तसेच या दिवशी पीक स्पर्धा (फळे), गाय, बैल, म्हैस, रेडा आदी प्राणी संवर्गातील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दि.१६ या रोजी महोत्सवाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
महाबळेश्वर वाई खंडाळा परिसरातील शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. डॉक्टर नितीनजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शरद कृषी महोत्सवाचे नियोजन होत असते.
