Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » लोकमंगल मध्ये’ दहावी शुभचिंतन , गुणगौरव व हस्तलिखित प्रकाशन सोहळा

लोकमंगल मध्ये’ दहावी शुभचिंतन , गुणगौरव व हस्तलिखित प्रकाशन सोहळा

ध्येयप्राप्तीसाठी कठोर परिश्रम गरजेचे

 ‘लोकमंगल मध्ये’ दहावी शुभचिंतन , गुणगौरव व हस्तलिखित प्रकाशन सोहळा

सातारा – (नागेवाडी) आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा योग्य उपयोग करून जीवनात काहीतरी करून दाखवा. ध्येयप्राप्तीसाठी कठोर परिश्रमा शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन बांधकाम व्यावसायिक विनोद शिंदे यांनी केले.

येथील लोक‌मंगल हायस्कूल नागेवाडी-कुशी विद्यालयात आयोजित शालेय वार्षिक पारितोषिक वितरण, दहावी शुभचिंतन व हस्तलिखित प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांची उपस्थिती होती.

विनोंद शिंदे, म्हणाले शालेय जीवनातील शिक्षण आयुष्याला आकार देते शाळेत झालेल्या संस्काराचा पुढील जीवनात उपयोग होतो .शिक्षक श्रीमंत असतात. मुलांनी ध्येय ठरवून वाटचाल करावी.

शिरीष चिटणीस, म्ह‌णाले बदलत्या सामाजिक परिस्थितीत विशेषतः मुलींनी किमान पदवीपर्यंत शिक्षण घ्यायलाच हवे. स्वतःच्या पायावर उभे राहता आले पाहिजे. आवडीच्या कलाकुणांचा विकास करा. संधीचे सोने करा.

वाचन, लेखन, चिंतन गरजेचे. जीवनात चांगले यश मिळवा.या प्रसंगी शशिकांत जाधव यांना महाराष्ट्र राज्य हिंदी महामंडळ व सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ यांच्यावतीने – राष्ट्रभाषा प्रचार-प्रसार अध्यापक पुरस्कार जाहिर झालेल्या बद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच विद्यालयातील उत्कृष्ट खेळाडू शिवम नाटेकर व श्रुतिका सावंत आदर्श विदयार्थी रोहिणी सावंत, प्रणम जंगम व इतर सर्व खेळाडूंना सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘चौफुला’ हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना स्मरणचिन्ह देवून कृतज्ञता व्यक्त केली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय सावंत यांनी केले. सूत्रसंचालन शशिकांत जमदाडे यांनी केले. शशिकांत जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान जाधव, अर्चना सावंत, राहुल घोडके, दिलीप सावंत व रमेश महामूलकर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Post Views: 19 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य

Live Cricket