लोकमंगल हायस्कूल नागेवाडी -कुशी मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा
शिक्षक दिन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती लोकमंगल हायस्कूल नागेवाडी मध्ये उत्साहात साजरी केली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय शिल्पा चिटणीस सचिव लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा व कवयित्री यांनी आपल्या भाषणात स्व अनुभव सांगितला की सेवानिवृत्तीनंतर आज विद्यार्थ्यांशी संवाद साधताना खऱ्या अर्थाने हा शिक्षक दिन साजरा होत आहे
याप्रसंगी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री चिटणीस यांनी सांगितले की कोणतीही जयंती पुण्यतिथी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे कारण या आपणाला प्रेरणा देत असतात. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ,लोकमान्य टिळक ,महर्षी कर्वे इत्यादींच्या कार्याची उदाहरण दिली विद्यार्थ्यांना ज्ञान घेण्यासाठी कुठलीही परिस्थिती ही आडवी येवू शकत नाही. बहुतेक देशांमध्ये शिक्षकाला मान आहे असेही त्यांनी प्रतिपादन केले. शिक्षक हा फक्त शिक्षकच असतो असे नाही तर तो मित्र ,सहकारी ,मार्गदर्शक असतो असे विचार मांडले याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय सावंत व शशिकांत जमदाडे यांनी शिक्षण दिना विषयक विचार मांडले
याप्रसंगी गणेश मतकर, चैताली पवार ,आदिती सावंत ,निहाल भोसले ,श्रेयस भिसे आदी विद्यार्थ्यांची शिक्षक दिनानिमित्त चे मनोगत आणि स्व अनुभव व्यक्त केले .याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक शशिकांत जाधव सर ,अर्चना सावंत मॅडम, दिलीप सावंत , रमेश महामुलकर आदी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रुतिका सावंत यांनी केली तर आभार विद्यालयाचे लिपीक राहुल घोडके सर यांनी केले.
