लोकसेवेच्या वाटेवरचे अढळ नेते एकनाथदादा ओंबळे यांच्या वाढदिवसानिमित्त करंजे (मेढा) येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळा
केळघर प्रतिनिधी -सातारा जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख एकनाथदादा ओंबळे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सोमवारी सकाळी दहा वाजता मंगलमूर्ती मंगल कार्यालय करंजे(मेढा) येथे अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिष्टचिंतन सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले ,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेना जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले,चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार, प्रा. श्रीधर साळुंखे,शिवसेना संपर्कप्रमुख नवी मुंबई अंकुश कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमात सत्कारासाठी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ इत्यादी भेटवस्तू न आणता शालोपयोगी वस्तू आणाव्यात असे आवाहन जावळी तालुका शिवसेना यांच्या वतीने करण्यात आले आहे.तरी अभिष्टचिंतन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जावळी तालुका शिवसेना,ग्रामस्थ मंडळ, जनसेवा प्रतिष्ठान केडंबे,एकनाथ दादा ओंबळे मित्र समुह जावळी तालुका यांनी केले आहे.
