यकृत निदान चिकित्सा शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
सातारा दि. २० : सातारा डायग्नोस्टिक सेंटर. व पंचभौतिक चिकित्सक डॉ. स्वप्निल जोशी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या यकृत निदान चिकित्सा शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला.
या शिबिरामध्ये तज्ञ वैद्या कडून तपासणी करण्यात आली. तसेच मोफत निदान व सल्ला देऊन माफक दरात औषधे देण्यात आली. सोनोग्राफी, रक्त लघवी तपासणीसाठी ५० टक्के देण्यात आली. सिटीस्कॅनसाठीही भरघोस सूट देण्यात आली.
प्रारंभी मासचे अध्यक्ष आणि शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयाचे संचालक राजेंद्र मोहिते यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यकृत विकाराबद्दल समाजामध्ये असलेले समज, गैरसमज आणि असलेली स्थिती याबाबत डॉ. स्वप्निल जोशी यांनी उपस्थितांसमोर विवेचन केले.
उद्घाटन प्रसंगी सिनियर सर्जन डॉ. पी.पी. जोशी, डॉ. सुषमा जोशी, डॉ. सुहास जोशी, डॉ. मृणाल जोशी, सीईओ विक्रम शिंदे, सीएओ डॉ. निलेश साबळे, डॉ. सुधीर पवार, जनसंपर्क अधिकारी श्रीकांत देशमुख तसेच सातारा हॉस्पिटल अँड सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथील स्टाफ उपस्थित होते. शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटरचे कार्यकारी संचालक व चेअरमन डॉ. सुरेश शिंदे, डॉ. जयश्री शिंदे, डॉ. विकास जाधव यांनी अभिनंदन केले.





