लेफ्टनंट आयुष बाबरचा गौरीशंकर मध्ये उचित सत्कार.
लिंब| उडतरे येथील आयुष बाबर या भूमिपुत्रांनी प्रतिकूलतेवर मात करीत भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदापर्यंत त्याने स्वकर्तुत्वावर झेप घेतली आहे.त्याबद्दल गौरीशंकर लिंब कॅम्पस मध्ये त्याचा उचित सत्कार संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते बुके स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.यावेळी गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, लिंब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष बेल्हेकर, डी फार्मसी चे प्राचार्य विजय राजे, एमबीए महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीप्ती बर्गे, डॉ.पी.व्ही.सुखात्मे स्कूल चे प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण, शानि देवस्थान ट्रस्ट सोळशीचे सचिव नरेंद्र बाबर, प्रशांत शेडगे आदि प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य ते शक्य करता येते हे लेफ्टनंट आयुष बाबर यांनी सिद्ध केले आहे.देशसेवेचा वारसा सातारा जिल्ह्याला लाभला आहे.उडतरे हे गाव सुद्धा आता सैनिकांचे गाव म्हणून ओळखू लागले आहे .जिद्द व कठोर परिश्रमाच्या बळावर आयुषने लेफ्टनंट हे पद मिळविले आहे, याचा आम्हाला निश्चित अभिमान वाटतो.लेफ्टनंट आयुष बाबर म्हणाले की,भारतीय सैन्याबद्दल लहानपणापासूनच मला खूप आकर्षण होते.आपणही देशासाठी सेवा करावी ही जिद्द मनात होती.अखेर कठोर परिश्रम व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मला हे यश मिळाले आहे.गौरीशंकर ने केलेला माझा सत्कार मला आयुष्यभर लक्षात राहील.गौरीशंकर च्या सत्कारामुळे मी भारावून गेलो आहे.भारतीय सैन्य दलाबद्दल असणारी आपुलकी व प्रेम यामधून दिसून येत आहे.प्रास्ताविक शैला शिंदे यांनी केले,आभार नितीन शिवथरे यांनी मानले.
भारतीय सैन्य दलातील प्रशिक्षण काळात उल्लेखनीय कामगिरी लेफ्टनंट आयुष बाबर यांनी करून दाखवली आहे.त्याने पासिंग परेडमध्ये चार बक्षीसे जिंकून ग्रुप कॅप्टन म्हणूनही आपल्या कर्तुत्वाची छाप त्यांनी उमटवली आहे.गया येथील प्रशिक्षण केंद्रात लेफ्टनंट आयुष बाबर यांनी तुकडीचे ही नेतृत्व करून सातारा जिल्ह्याची शान त्यांनी वाढवली आहे.
उडतरे येथील शहीद जवान अशोक बाबर यांचा तो पुतण्या असून त्यांचे देशसवेचे अपूर्व कार्य पुर्ण करण्याची जिद्द बाळगुन त्यांनी भारतीय सैन्य दलात सेवा करण्याचा निर्धार केला आहे.उडतरे भूमीला सैनिकी परंपरेचा मोठा इतिहास आहे.सैनिकी भूमीबरोबरच आता लेफ्टनंट आयुष बाबर मुळे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून नव्याने ओळख उडतरेची होणार आहे.





