Home » राज्य » नेतृत्व जे विश्वासाने कमावले—महाबळेश्वरचा नगराध्यक्ष म्हणून सुनीलशेठ शिंदे नाव सर्वाधिक पुढे

नेतृत्व जे विश्वासाने कमावले—महाबळेश्वरचा नगराध्यक्ष म्हणून सुनीलशेठ शिंदे नाव सर्वाधिक पुढे

नेतृत्व जे विश्वासाने कमावले—महाबळेश्वरचा नगराध्यक्ष म्हणून सुनीलशेठ शिंदे नाव सर्वाधिक पुढे

महाबळेश्वर प्रतिनिधी-महाबळेश्वर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असून, शहरभर एक नाव विशेष चर्चेत आहे—सुनील शेठ शिंदे. २५ वर्षांची अखंड कारकीर्द, सेवाभावी प्रतिमा आणि साधेपणाच्या बळावर नागरिकांशी घट्ट नातं जोडणारे शिंदे हे नगराध्यक्षपदासाठी जनतेचा प्रमुख पर्याय ठरत आहेत.

नागरिकांच्या समस्या सोडवणारा, नेहमी उपलब्ध राहणारा चेहरा

नगरपालिकेतील दीर्घ सेवाकाळात शिंदे यांनी प्रशासकीय चौकटीत अडकून न राहता थेट नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले.“लहान काम असो की मोठं… फोन केला की सुनील शेठ लगेच येतात,” अशी प्रतिक्रिया शहरातील अनेक नागरिकांकडून ऐकायला मिळते. त्यामुळे ते केवळ कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधी न राहता, प्रत्येक कुटुंबाच्या विश्वासातील व्यक्ती ठरले आहेत.

साधेपणा, विनयशीलता आणि शांत स्वभाव—लोकांना भुरळ घालणारे गुण

मितभाषी, शांत आणि विनयशील स्वभाव ही सुनील शेठ यांची खरी ओळख. दिखावा किंवा आक्रमक राजकारणापेक्षा जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण कार्यप्रणालीवर त्यांचा नेहमी भर राहिला आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा लोकांचा विश्वास वर्षागणिक अधिक दृढ होत गेल्याचं दिसून येत आहे.

कष्टकरी कुटुंबातून आलेला वारसा; समाजसेवेची परंपरा कायम

शिंदे कुटुंब हे महाबळेश्वरमधील आदराचे आणि जनसंपर्कात मजबूत मानले जाणारे कुटुंब. माजी नगराध्यक्ष किसन शेठ शिंदे यांची सामाजिक परंपरा आजही शहरात आदराने स्मरली जाते. समाजसेवक डी एल. शिंदे साहेब यांचे नाव समाजात आदराने घेतले जाते  याच घराण्यात वाढलेल्या सुनील शेठ यांनी मेहनत, माणुसकी आणि लोकसेवेच्या बळावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

आरक्षण जाहीर होताच वाढली चर्चा : “नगराध्यक्ष आपल्यातलाच असावा”

नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण गटाचे आरक्षण घोषित झाल्यानंतर शहरात शिंदे यांच्या नावाभोवती मोठी चळवळ दिसत आहे.विविध समाजघटक, व्यापारी वर्ग, महिला संघटना आणि तरुणांची मंडळं या सर्वांचा कल “कामाचा इतिहास आणि विश्वास” या निकषांवर शिंदेंना पाठिंबा देण्याकडे झुकलेला दिसतो.

“जनतेचा विश्वास हीच माझी ताकद” — सुनील शिंदे

लोकसंपर्क मोहिमेला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल बोलताना शिंदे म्हणाले,जनतेचा विश्वास हा माझ्यासाठी सर्वात मोठा आधार आहे. आशीर्वाद मिळाला तर महाबळेश्वरला आदर्श नगरपालिकेच्या स्तरावर उभं करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करीन.”

शहरातील प्रत्येक प्रभागातून त्यांना मिळत असलेला उत्साहवर्धक प्रतिसाद ही त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष आहे.

नवी निवडणूक… नवं नेतृत्व?

आगामी निवडणुकीत सुनील शेठ शिंदे हे केवळ राजकीय चर्चेचे केंद्र नाहीत, तर ते जनभावनेचा स्वाभाविक उमाळा आहेत. तात्कालिक राजकीय समीकरणांपेक्षा जनतेचा विश्वास, दीर्घ सेवासंपन्न इतिहास आणि माणुसकीचा ठसा—या तीन आधारांवर त्यांची छाप अधिक प्रभावी ठरत आहे.

महाबळेश्वरमध्ये सध्या एकच प्रश्न वारंवार ऐकू येतो—

“पुढील पाच वर्षांसाठी शहराचं नेतृत्व कोणाकडे असावं?”

अनेक नागरिक ताबडतोब उत्तर देतात—

“आपल्यातला, आपल्यासाठी काम केलेला… सुनील शेठ शिंदे!”

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Live Cricket