Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी’ ललित संग्रहाचे लोकार्पण उत्साहात लेखनशैली, बोलीभाषा आणि वास्तवदर्शी कथनशैलीला दाद

एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी’ ललित संग्रहाचे लोकार्पण उत्साहात लेखनशैली, बोलीभाषा आणि वास्तवदर्शी कथनशैलीला दाद

एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी’ ललित संग्रहाचे लोकार्पण उत्साहात लेखनशैली, बोलीभाषा आणि वास्तवदर्शी कथनशैलीला दाद

सातारा- दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे संगीता अरबुने लिखित व शब्दालय प्रकाशन प्रकाशित एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी’ या ललित लेखसंग्रहाचा लोकार्पण सोहळा व चर्चासत्र दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, शनिवार पेठ येथे पार पडले. कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

व्यासपीठावर स्वतः लेखिका संगीता अरबुने,ऍड सीमंतिनी नूलकर, लेखिका व कवयित्री शिल्पा चिटणीस, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके, म.सा.प. कार्यवाह (पुणे) शिरीष चिटणीस उपस्थित होते

यावेळी सीमंतिनी नूलकर म्हणाल्या,“या पुस्तकाचे शीर्षक आगळेवेगळे असल्यामुळेच माझे लक्ष वेधले. लेखिकेने स्वतःचे अनुभव लिहिले असले तरी हे आत्मचरित्र नाही. कोणताही आक्रस्ताळेपणा न करता शांत व संयत भाषेत व्यक्तिमत्व कसे आकाराला येते हे पुस्तक उलगडते. दोष न देणे हा त्यांच्या लेखनाचा मोठा गुण आहे. लेखनामधील टर्निंग पॉईंट्स अतिशय प्रभावी आहेत.”

लेखिका व कवयित्री शिल्पा चिटणीस म्हणाल्या,“संगीतात एक उत्तम कवयित्री दडलेली आहे. तिच्या कवितांचे पडसाद तिच्या लेखनात स्पष्ट उमटतात. तिची निर्मिती अत्यंत वास्तवदर्शी आहे. कुठेही बडेजाव नाही; संस्कृती, नातेसंबंध आणि बारीकसारीक प्रसंगांची सुंदर मांडणी पुस्तकभर दिसते. बोलीभाषा प्रमाण भाषेला समृद्ध करते, हे पुस्तक त्याचे उत्तम उदाहरण आहे. सार्वजनिक शौचालयाच्या बिकट अवस्थेचे केलेले वर्णन विशेष उल्लेखनीय आहे.”

यावेळी त्यांनी स्वतःची ‘बायका’ कविता सादर केली

ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके म्हणाले,“शब्दालय प्रकाशनाचे हे साडेसातशेवे प्रकाशन आहे. आईचा शोध संपूर्ण लेखनामध्ये सतत जाणवतो. अस्पर्श विषयाला त्यांनी सहजतेने स्पर्श केलेला आहे. हा आठवणींचा कोलाज आहे. लेखिकेने दुःख सांगितले, पण त्याचा बाऊ केला नाही. स्वतःला भूतकाळात ठेवून त्या लेखन करतात आणि वाचक मात्र त्याच्याशी जोडला जातो. पुस्तकाच्या पुढील—दुसऱ्या, तिसऱ्या—भागांची अपेक्षा आहे

 शिरीष चिटणीस म्हणाले,

“संगीता अरबुने यांच्या शब्दांची ताकद अपूर्व आहे. त्या मुंबई साहित्य परिषदेवर निवडून आलेल्या आहेत तसेच सातारा ग्रंथमित्र पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या आहेत. लोणंद, सातारा आणि वाठार परिसरातील अनुभवांचे जिवंत चित्रण पुस्तकात आढळते. खडतर परिस्थितीतून त्यांनी केलेली वाटचाल प्रेरणादायी आहे. पुस्तकातील प्रसंग सहजगत्या आपल्याशी जोडले जातात. युवा पिढीसाठी हे पुस्तक आदर्श आहे

लेखिका संगीता अरबुने म्हणाल्या,

“दीपलक्ष्मी पतसंस्था साताऱ्यात असे साहित्यिक उपक्रम राबवतेय हे अत्यंत कौतुकास्पद आहे. माझ्या लेखनातील सर्व आठवणी साताऱ्याशी निगडित आहेत. कलाकृतीच्या निर्मितीला वेळ लागतो; पाच–सात वर्षांपूर्वी हे लिहिले असते तर इतकी प्रगल्भता आली नसती. कलाकाराला स्वातंत्र्य मिळाले की तो अधिक फुलतो—मला ते लाभले. बोलीभाषा आपण जपली पाहिजे. सातारी बोली ही रांगोळी आहे, आणि तिच्यात दडलेले सौंदर्य मोठे आहे.”यावेळी सोनल अरबुने हिनेही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास डॉक्टर संदीप श्रोत्री,डॉ मोहन सुखटनकर, प्रा. संध्या चौगुले, गौतम भोसले, आप्पासा शालगर, मकरंद गोंधळी, अरुण कुलकर्णी, आनंदा ननावरे, बाळकृष्ण इंगळे, अनिल सुर्वे, डी. एम. पाटील, हणमंत खुडे, शेग्या गावित, संदीप जाधव, जगदीश खंडागळे, रमेश महामूलकर, विपुल लोहार, दत्तात्रय शिर्के, संदीप भोसले, विजय गव्हाळे आणि चंद्रकांत देवगड, शुभम बल्लाळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष चिटणीस यांनी केले व सर्वांचे आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम‘आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा सातारा  प्रतिनिधी –साताऱ्याची ओळख, संस्कृती, एकतेचा अभिमान आणि

Live Cricket