Post Views: 71
लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक
लडाखमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी सामजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक केली गेली आहे. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जावा या मागणीसाठी वांगचूक हे उपोषणाला बसले होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५० पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान सुरक्षेची उपाययोजना म्हणून वांगचूक यांच्या अटकेनंतर लेहमधली मोबाइल इंटरनेट सेवा बंद केली आहे, तर ब्रॉडबँड इंटरनेटचा वेगही कमी केला आहे. कारगिलसह इतर शहरांमध्येही जमावबंदी लागू केली आहे.
