Home » ठळक बातम्या » कार्यकाळात महाबळेश्वरच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी आणला : कुमार शिंदे

कार्यकाळात महाबळेश्वरच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी आणला : कुमार शिंदे

कार्यकाळात महाबळेश्वरच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी आणला : कुमार शिंदे

महाबळेश्वर, दि. २३ : स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत महाबळेश्वर नगरपालिकेला दहा कोटी रुपयांचं बक्षीस देऊन शासनाने केलेला गौरव ही गत पंचवार्षिक मध्ये आम्हीं सत्तेत असताना केलेल्या कामांची पोहोचपावती आहे. विकासाचा ध्यास घेऊन महाबळेश्वरला पर्यटकांचे हब केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमारभाऊ शिंदे यांनी व्यक्त केला. 

महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी नगरसेवक कुमारभाऊ शिंदे हे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यांच्यासह २० नगरसेवक या निवडणुकीत उभे आहेत. उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

महाबळेश्वर नगरपालिकेला आतापर्यंत सर्वात मोठा निधी कसा उपलब्ध करून दिला याबाबत माध्यमांशी बोलताना कुमारभाऊ शिंदे म्हणाले की, २०१८-१९ मध्ये महाबळेश्वर नगरपालिकेचे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये भारतामध्ये नाव झाले. त्यावेळी प्रथम क्रमांकाचे सुमारे दहा कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाबळेश्वर येथील तीन रस्त्यांना ३६ कोटी रुपयांचा निधी मिळवला. त्यातील 80 टक्के कामे पूर्ण झाली. काही अपूर्ण कामे नजिकच्या काळात पाठपुरावा करून पूर्णत्वास नेली जातील. त्याचप्रमाणे महाबळेश्वर मधील मोठे प्रकल्प राबवण्यासाठी १०० कोटींचा प्रस्ताव पाठवून निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार तरतूद देखील झाली. त्यामधील काही निधी देखील आला. त्यामध्ये महाबळेश्वर बाजारपेठ सुशोभीकरणाची कामे सुरू झाली. परंतु कोविडमुळे कामाला खीळ बसली. दरम्यान नगरसेवक, नगराध्यक्ष पदाची मुदत देखील संपली. त्यानंतर पालिकेवर प्रशासक आला. त्यामुळे पुढील विकास कामे करता आली नाहीत.

विकास कामांचे नवनवीन प्रस्ताव तयार करणे, त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करणे, त्याला मंजूरी मिळवणे या कामांचा माझा असणारा प्रदीर्घ अनुभव हा येणाऱ्या काळात महाबळेश्वर शहरातील विविध समस्या व विकास कामे करताना उपयोगी येईल. 

महाबळेश्वर शहराला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन स्थळांच्या क्रमवारी मध्ये ‘ब’ वर्ग पर्यटन‌ दर्जा मिळवून दिला आहे. क्षेत्र महाबळेश्वर रोड, डचेस रोड, लॉडविक पॉईंट रस्ता हे तीन कॉन्क्रीट रस्ते करण्यात आले. बाजारपेठ अंडरग्राउंड केबलिंग करण्याचा निर्णय आमच्याच कार्यकाळात झाला.

ग्लेन ओगल डॅम येथे लाईट व लेजर शो साठी ६ कोटी रुपयांचा निधीची उपलब्धता करण्यात आली. हॉटेल ड्रीम लँड लगत असणाऱ्या फुटपाथवर खाऊ-गल्ली उभारणीसाठी सुरुवात करण्यात आली. परंतु प्रशासकांच्या गलथान कारभारामुळे सदर प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत अडकले त्याचा पाठपुरावा सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने काढलेल्या अधिसूचने नुसार टॅक्सी परवाने (काळी-पिवळी) ओपन करण्यात आले होते. परंतु अधि पासून ५०० पेक्षा जास्त (काळी-पिवळी) टॅक्सी, महाबळेश्वर शहरामध्ये आहेत. नव्याने खुल्या झालेले टॅक्सी परवान्यांमुळे शहरात अधिक गाड्या वाढल्या असत्या. याचा परिणाम व्यवसायावर झाला असता. म्हणून कायदेशीर मार्गाचा अवलंब करून न्यायालयीन लढा देत स्थानीक टॅक्सी संघटनेला मदत करत नव्याने परवाने वितरीत करने रद्द करण्यात यश आल्याचे कुमारभाऊ शिंदे यांनी सांगितले.

महाबळेश्वर : मतदारांशी संवाद साधताना कुमारभाऊ शिंदे. 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’

Post Views: 73 वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई

Live Cricket