कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स तर्फे सोलापूरमधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात .
एकतेचे प्रतीक म्हणून, कराडमधील कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सने सोलापूरमधील विनाशकारी पुरामुळे बाधित विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण शैक्षणिक मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आपत्तीत पुस्तके, स्टेशनरी आणि इतर शैक्षणिक साधने गमावलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी महाविद्यालयाने आवश्यक शालेय साहित्य गोळा करून पाठवण्याची मोहीम आयोजित केली.
अलीकडील मुसळधार पावसानंतर सोलापूर जिल्ह्यात प्रचंड पूर आला ज्यामुळे माढा, मोहोळ आणि बार्शीसह अनेक तालुक्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले. पुरामुळे केवळ घरांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नाही तर त्यांचे सामान गमावलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणही विस्कळीत झाले आहे.
आधाराची तातडीची गरज ओळखून कोटा ज्युनिअर कॉलेजचे संचालक डॉ. महेश खुस्पे सर व संचालिका सौ मंजिरी खुस्पे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आपल्या इच्छेनुसार जमा करण्याचे आवाहन केले. तसेच स्वतः हि भरपूर साहित्य दिले व शैक्षणिक साहित्य संकलन मोहीम सुरुवात केली या मोहिमेला सुद्धा विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद देऊन शैक्षणिक साहित्य पूरग्रस्तांसाठी जमविले व ते साहित्य पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी पाठविण्यात आले.
समाजातील अशा अडचणीच्या काळामध्ये संस्थेचे संचालक डॉ. महेश खुस्पे सर संचालिका सौ. मंजिरी खुस्पे मॅडम हे सतत मदतशील भूमिका घेत असतात व तळागाळातील लोकांपर्यंत त्यांच्या अडचणींना मदत करण्यासाठी प्रत्येक वेळी खंबीर उभे असतात.लायन्स क्लब कराड तर्फे हि अनेक लोकांनी मदतीचा हात दिला .
