कोरेगावात ३३ लाखाची संरक्षक भिंत ३३ दिवसात पडली
भिंतीच्या कामात मोठा भ्रष्टाचार रमेश उबळेंचा आरोप
कोरेगाव ::– कोरेगाव नगर पंचायतिने हनुमान घाटावर बांधलेली सुमारे ३३ लाख रुपये खर्च करून बांधलेली भिंत केवळ ३३ दिवसात पडली आहे. दरम्यान रमेश उबाळे यांनी या भिंतीची पाहणी करून या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त केली. जिल्ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी याबाबत निवेदनही दिले आहे.हे काम ज्या ठेकेदाराने केले आहे त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे ,अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आपण ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
रमेश उबाळे यावेळी बोलताना म्हणाले, हनुमानघाट हा शहरातील प्रमुख परिसर आहे. येथून तीळगंगानदी वाहते हनुमानघाटात कोरेगाव नगर पंचायतीने ३३ लाख २५ हजार ५०० रुपये खर्च करून बांधलेली ही भिंत केवळ ३३ दिवसात पडली आहे.ही लाजिरवाणे बाब आहे. याबाबत आपण जिल्हाधिकारी तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही निवेदन दिले आहे.
यावेळी जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देताना त्यांचेसोबत सामाजिक कार्यकर्ते दिनेश सणस उपस्थित होते.
भाजी मंडईच्या कामाची काळजी वाटते- दिनेश सणस यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश सणस म्हणाले हनुमान घाटातील संरक्षक भिंत ३३ दिवसात पडत असेल तर आझादचौकात होणाऱ्या कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या भाजीमंडईच्या कामाची आम्हाला आता काळजी वाटते.
फोटो ओळी – जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देताना रमेश उबाळे, दिनेश सणस