Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कोरेगावमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आरोग्य जागृतीसाठी प्रबोधन आवश्यक – नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे

कोरेगावमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आरोग्य जागृतीसाठी प्रबोधन आवश्यक – नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे 

कोरेगावमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

आरोग्य जागृतीसाठी प्रबोधन आवश्यक – नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे 

कोरेगाव |आरोग्य जागृतीसाठी प्रबोधन आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोरेगांव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त केले.संजीवन हॉस्पीटल सातारा यांच्या सहयोगाने छत्रपती संभाजीनगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन कोरेगांव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ फत्तेसिंह बर्गे व माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, धनसंतोष परिवाराचे कुटुंबप्रमुख भाऊसाहेब नलावडे, सौ. विमलताई नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

कोरेगांव नगरीतील जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी संपूर्ण शहरात उत्तम जनजागृती झाली असून अशी शिबिरे प्रत्येक प्रभागात होणे गरजेचे असल्याचेही राजाभाऊ बर्गे म्हणाले.माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर मधील उपक्रम नेहमीच समाजास दिशादर्शक ठरणारे असतात, जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय असल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे यांनी केले तर स्वागत छत्रपती संभाजीनगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रणव बर्गे, विजयराव सपकाळ, प्रशांत गायकवाड, अजित चव्हाण, दत्तात्रय जगताप, दिनेश मालुसरे, भाऊसाहेब मोहोड, अभिषेक शेरे, मयूर शिंदे, हर्षल जगदाळे यांनी केले.

संजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. विशाल गावडे, डॉ. नीती यादव, शिवाजी नलावडे, सलीम बागवान भिकाजी देशमुख यांच्यासह संजीवन नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

या शिबिरात विविध आरोग्य तपासण्या, सल्लामसलत तसेच आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे, ५० हून अधिक नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आयोजकांनीही भविष्यात अशी शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 122 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket