कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान
सातारा जिल्ह्यातील कोडोली गावचे प्रगतशील शेतकरी आणि पशुपालक श्री. रामचंद्र केशव जाधव यांनी उस्मानाबादी शेळी संवर्धन आणि पैदास क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्युरो (ICAR-NBAGR) यांच्या वतीने दिला जाणारा Breed conservation हा पुरस्कार उस्मानाबादी शेळी जात संवर्धनासाठी नवी दिल्ली येथे मा. केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
श्री. जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून उस्मानाबादी या देशी शेळीच्या जातीचे शुद्ध स्वरूप टिकवण्यासाठी आणि तिची उत्पादकता वाढवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता, शास्त्रीय पद्धतीने संगोपन आणि अनुवंशिक गुणधर्म जतन करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या याच योगदानामुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
महाराष्ट्र पशुवैभवासाठी नवी दिशा
उस्मानाबादी शेळी ही महाराष्ट्राची शान मानली जाते. दुष्काळी भागातही तग धरण्याची क्षमता आणि उत्तम रोगप्रतिकारशक्ती यामुळे ही जात पशुपालकांमध्ये लोकप्रिय आहे. श्री. जाधव यांना मिळालेला हा पुरस्कार राज्यातील इतर उस्मानाबादी शेळी पालकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या गौरवामुळे देशी पशुधनाच्या संवर्धनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
हा पुरस्कार मिळण्याच्या त्यांच्या मोलाच्या कामगिरीमध्ये त्यांना महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर याचे कुलगुरू मा. नितीन पाटील, माजी विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने, तसेच संचालक विस्तार डॉ सचिन बोंडे, संचालक संशोधन डॉ नितीन कुरकुरे, संचालक शिक्षण व अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये तसेच क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. विकास वासकर तसेच डॉ. गोकुळ सोनवणे, डॉ. तेजस शेंडे, डॉ. राजू शेलार मा. ऋषी कुमार फुले यांचे फार मोलाचे योगदान लाभले
तसेच त्यांचे वडील श्री केशव धोंडिबा जाधव (आष्टेकर आबा) आई सौ बबिता केशव जाधव दोन्ही भाऊ श्री शाम जाधव श्री सतीश जाधव पत्नी सौ क्षितिजा जाधव पूर्ण कुटुंब आणि कोडोली/खिंडवाडी ग्रामस्थ मित्र यांचे फार मोलाचे योगदान लाभले.



