खोजेवाडी ते देशमुखनगर रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ युवा उद्योजक विक्रमनाना घोरपडे यांचे शुभहस्ते संपन्न
सातारा -आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खोजेवाडी ते देशमुखनगर रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ युवा उद्योजक विक्रमनाना घोरपडे यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी तालुका खरेदी विक्री संघ चेअरमन सुनील काटे, सुनीलकाका देशमुख, संभाजी बापू चव्हाण, अरुणदादा कणसे चेअरमन विकास सेवा सोसायटी लिंबाचिवाडी, डॉ.विजय जाधव,सरपंच बबन माने टिटवेवाडी, सरपंच सुधीर शेळके जावळापूर, सरपंच प्रशांत कणसे लिंबाचिवाडी, अधिकराव घाडगे फत्त्यापूर, बाजार सभापती माजी उपसभापती बाबासाहेब घोरपडे अण्णा, कॅप्टन शिवाजीराव घोरपडे, आजी माजी सैनिक संघटना खोजेवाडी अध्यक्ष जगन्नाथ दादा घोरपडे, मा लक्ष्मण तात्या घोरपडे, श्री. रामबापू आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील गावोगावीचे रस्ते दर्जेदार आणि उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांचे विशेष प्रयत्न असतात.
