पाचगणी ; पाचगणी खिंगर येथील एका रिसॉर्टवर वर बारबाला नाचवल्या याप्रकरणी दहा ते बारा बालांसह सोलापूर जिल्ह्यातील 24 खते औषधे बी बियाणे विक्रेत्या डीलर असे एकूण 35 ते ते 36 जणांवर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व ऍडिशनल एसपी आचल दलाल यांनी या टेन्ट हाऊस रिसॉर्टवर छापा टाकून कारवाई केली असल्याने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे यामध्ये रिसॉर्ट चा मालक यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
काल रात्री साडेदहा ते अकरा च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे याप्रकरनी रात्री उशिरापर्यंत पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती
जागतिक थंड हवेचे ठिकाण म्हणून पांचगणी परिसर प्रसिद्ध त्यामुळे पर्यटकांचा ओढा याठिकाणी असतो. मात्र या नावाखाली अनेक अपप्रवृत्ती वाढू लागल्या आहेत. बारबाला आणून नाचवणे हा त्यातीलच एक प्रकार. यासाठी दलालांची मोठी साखळी असण्याची शक्यता आहे.
