Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » खेळातून यश संपादन करण्याची व सहकार्याची प्रेरणा मिळते- श्री संजयकुमार सुद्रीक.

खेळातून यश संपादन करण्याची व सहकार्याची प्रेरणा मिळते- श्री संजयकुमार सुद्रीक.

खेळातून यश संपादन करण्याची व सहकार्याची प्रेरणा मिळते- श्री संजयकुमार सुद्रीक.

 वाई दि २५ :- यश अपयशापेक्षा खेळाचा आनंद घेवून सहकार्याची संघभावना जोपासावी हे खेळ आपल्याला शिकवितात. भारत महासत्तेकडे वाटचाल करत आहे परंतु माणूस एकमेकांपासून दूर जात आहे. अशावेळी शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी एकमेकांना सहकार्याची भावना ठेवावी. असे उद् गार साताराचे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक श्री. संजयकुमार सुद्रीक यांनी काढले. 

    वाईतील ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त ज्ञानदीप को – ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांच्या सौज्यन्याने वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धा व पारितोषिक वितरण -२०२४-२५ प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

          सुद्रिक साहेब पुढे म्हणाले ज्या क्षेत्रात आवड आहे. तिथे एकमेकांना सहकार्य करत कौशल्ये विकसित करा. समाज मोठा करा. संघभावनेने सहकार्याने देश मोठा होईल.

  यावेळी  ज्ञानदीप को आप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री. जिजाबा पवार हे आपल्या मनोगतात म्हणाले आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 चालू आहे. यानिमित्ताने या स्पर्धेसाठी व विविध विधायक कार्यक्रमांसाठी ज्ञानदीप बँक सहकार्य करत आहे. ग्राहक मेळावे,हळदी कुंकू कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, विविध सामाजिक विधायक कार्य उभी करण्यासाठी अनेक प्रकारची मदत केली आहे व करत राहील व सहकार्याची भावना ज्ञानदीप बँक जोपासत आहे व राहील यामुळेच ज्ञानदीप बँक सहकार विभागात राज्यात अव्वल आहे तसेच ज्ञानदीप स्कूलही शिक्षणाचे उत्तम कार्य करीत असल्याचे जिल्हात अव्वल शाळा म्हणून गणना होते.

        यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष एकनाथ जगताप म्हणाले शालेय क्रीडा व विविध स्पर्धांचे उत्तम आयोजन ज्ञानदीप स्कूल नेहमी करत असते. त्यामुळे शाळेचे दरवर्षी राज्य राष्ट्रीय खेळाडू घडतात व स्कॉलरशिप, 10 वी 12 बोर्ड व विविध स्पर्धां परिक्षेतही उत्तम यश मिळवित आहेत.अनेक शैक्षणिक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविल्यामुळे शासनाच्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमातही या वर्षी आपले ज्ञानदीप स्कूल तालुक्यात प्रथम आले. मुख्याध्यापक शुभांगी पवार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व सर्व ज्ञानदीप परिवाराचे मी अभिनंदन करतो व शाळेला केलेल्या सहकार्याबद्दल सर्वाचे आभार मानतो. व शाळेची यशाची परंपरा अशीच सुरू ठेवावी ही अपेक्षा व्यक्त केली.

       यावेळी ज्ञानदीप को-ऑप क्रेडिट सोसा चे संस्थापक-संचालक श्री.विश्वनाथ पवार, उपाध्यक्ष श्री चंद्रकांत ढमाळ. विद्यावर्धिनी संस्थेचे सचिव श्री बाळकृष्ण पवार , खजिनदार श्री चंद्रकांत शिंदे, विश्वस्त श्री दिलीप चव्हाण, श्री दत्ता मर्ढेकर, प्राचार्या शुभांगी पवार,ज्ञानदीप बँकचे अधिकारी श्री दत्तात्रय नावडकर, श्री.विश्वनाथ पोळ, श्री.मोहन गाढवे, श्री.अशोक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

         यावेळी विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारांची स्पर्धा घेण्यात आल्या.तसेच एक नाविण्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांबरोबरच पुरुष -महिला व पती-पत्नी अशा पालकांसाठी ही विविध खेळ प्रकारचे आयोजन केले होते. यात पालकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. विजेत्या पालकांना व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

      शाळेच्या प्राचार्या शुभांगी पवार व क्रीडा विभागप्रमुख श्री सचिन लेंभे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच वयोगटानुसार उत्कृष्ट कामगिरी केलेले निधिश दिपक दुधे,कु. माहेश्वरी मयुर जमदाडे, निलराज नितीन काळे,कु. संस्कृती मगन लोखंडे,श्लोक गणेश कोंदे, राजवीर विक्रम भोईटे, कु.आर्या मनोज पवार,पुष्कर दिपक निकम, कु.आदिती दत्तात्रय जगताप या विद्यार्थी खेळाडूंना सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.   

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सौ.शिला खाडे व सौ.कविता नलावडे यांनी व आभार श्री सचिन लेंभे यांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 522 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket