खटावच्या शैक्षणिक प्रगतीत सनशाईन स्कूलचे मोलाचे योगदान-डॉ.प्रियाताई शिंदे
सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूलचा पंधरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न
खटाव- ज्ञानदानातून समाज परिवर्तनाचा वसा घेऊन वाटचाल करणाऱ्या गौरीशंकर ज्ञानपीठ संचलित सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल ने खटावच्या शैक्षणिक प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. असे मत डॉ.प्रियाताई महेश शिंदे यांनी व्यक्त केले. गौरीशंकर सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल, खटावच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी स्कूलच्या प्राचार्या प्रमिला टकले,पालक प्रतिनिधी व माजी विद्यार्थी आदी प्रमुख उपस्थित होते. डॉ. प्रियाताई शिंदे पुढे म्हणाल्या की, खटावच्या भूमीत गौरीशंकर रुपी ज्ञानाचे रोपटे लावणारे मदनराव जगताप यांनी खटावच्या शैक्षणिक परिवर्तनाचे पाहिलेले स्वप्न आता खऱ्या अर्थाने साकार होत आहे. यावेळी स्कूलचा माजी विद्यार्थी यशराज अंबादास कदम हा वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस पदवी प्राप्त करून डॉक्टर झाल्याबद्दल तसेच भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी यश महेश यादव याची झालेली निवड तसेच या क्षेत्रात रसिका संजय फडतरे हिची ऑफिसर पदी झालेल्या निवडीबद्दल या माजी विद्यार्थ्यांचा डॉ प्रियाताई महेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक रघुनाथ घाडगे यांनी केले सूत्रसंचालन स्मिता मगर यांनी केले. माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ.अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, अप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी अभिनंदन केले. फोटो खटाव येथे सनशाईन स्कूलमध्ये डॉ. प्रियाताई शिंदे यांचे स्वागत करताना प्राचार्या प्रमिला टकले.
