Home » ठळक बातम्या » खटाव तालुक्यातून मताधिक्य घेऊ असे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांचा स्वप्नभंग करणार असून जयाभाऊला आपण मताधिक्य मिळवून देणार-शेखरभाऊ गोरे

खटाव तालुक्यातून मताधिक्य घेऊ असे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांचा स्वप्नभंग करणार असून जयाभाऊला आपण मताधिक्य मिळवून देणार-शेखरभाऊ गोरे 

खटाव तालुक्यातून मताधिक्य घेऊ असे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांचा स्वप्नभंग करणार असून जयाभाऊला आपण मताधिक्य मिळवून देणार-शेखरभाऊ गोरे 

सातारा : राज्याचे कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्री व भाजपाचे नेते,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा भाजपा महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांची ताकद वाढवणे गरजेच आहे.यासाठी माणखटावचे भाजपाचे उमेदवार आ.जयकुमार गोरे यांच्यासह कराड उत्तर,दक्षिण, सातारा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे असे आवाहन सातारा जि.बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांनी केले.

 माणखटाव मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आ.जयकुमार गोरेंच्या प्रचारार्थ गावभेटी दरम्यान ते बोलत होते.

शेखरभाऊ गोरे म्हणाले,माणखटावची राष्ट्रवादी फलटणला महाराजांच्या वाड्यात गहाण ठेवली गेलीय.जोपर्यंत त्यांच्या दावणीला माणखटावची राष्ट्रवादी आहे तोपर्यंत माणखटावमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा आमदार होण अशक्य आहे.त्यांना कायम मुजरा घालणारी लोक हवी आहेत.जे स्वार्थापोटी दोन डगरीवर हात ठेवतात त्यांना विचारून उमेदवारी ठरवण्यात येते.याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज आहेत.त्यामुळेच ते आपल्या गटात प्रवेश करत आहेत.या निवडणूकीत आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेत राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

 शेखरभाऊ गोरे म्हणाले,सख्ख्या भावाविरोधात मी 12 वर्षे संघर्ष केलाय.राष्ट्रवादी ने माझ्यावर अन्याय केला ते बरेच झाले नाहीतर आम्ही कधीच एकत्र आलो नसतो.अन आता एकत्र आलोयच तर विरोधकांनाही दाखवून देतो भाऊभाऊ एकत्र आले काय होत ते.खटाव तालुक्यातून मताधिक्य घेऊ असे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांचा स्वप्नभंग करणार असून जयाभाऊला आपण मताधिक्य मिळवून देणार हा आपला शब्द आहे.

 खटावचा विंचूतात्या ओम भट स्वाहा म्हणेल..

एका मराठी चित्रपटात विंचू तात्या ओम भट स्वाहा म्हणत एकाच्या छाताडावर बसून गळा दाबून त्याला मारायचा प्रयत्न करत होता.त्याच्या पुढे जाऊन आपल्या मतदारसंघात परबू तात्यांनी असा प्रकार केला आहे.ओम भट स्वाहा म्हणत कारखान्यात एका कामगाराचा खून केला आहे. अशा विंचू तात्याचा बंदोबस्त करून त्यांना घरीच बसवावे लागेल नाहीतर हा खटावचा विंचू तात्या अजून अनेकांच्या छाताडावर बसून ओम भट स्वाहा म्हणेल.

मायणीचा काळ्या गॉगलला दिवसा तारे दाखवू….कायम डोळ्यावर काळी झापड लावणाऱ्या मायणीच्या काळ्या गॉगलवाल्याने आमच्या गोऱ्यांच्या नादाला लागू नये.बोराटवाडीत वाघ राहतात हे बहुतेक मायणीच्या या कोल्ह्याला माहित नसेल.अन सगळ्या गोऱ्यांची तुला गरज नाही मी एकटा बास आहे.तू बोराटवाडीत यायची पण गरज नाही तु फक्त एकदा सांग कुठं येऊ ते.तुझ्या काळ्या झापडासह तुला दिवसा तारे दाखवतो.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket