खडकी येथील गुजाबा आबाजी जाधव उर्फ आप्पा नवनिर्वाचित उपसरपंच पदी निवड
वाई प्रतिनिधी( शुभम कोदे)खडकी तालुका वाई येथील ग्रामपंचायतीची नुकतीच नवनिर्वाचित उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली त्यामध्ये गुजाबा आबाजी जाधव उर्फ आप्पा यांची खडकी गावचे उपसरपंच पदी म्हणून निवड झाली ही निवडणूक नायब तहसीलदार बी एम जगदाळे, मंडल अधिकारी ललिता कोरडे मॅडम, ग्राम महसूल अधिकारी सागर माळेकर व खडकी गावचे युवानेतृत्व, पॅनल प्रमुख योगेश शिंगटे पाटील यांच्या उपस्थित करण्यात आली.
दरम्यान दुपारी दोन वाजता विशेष मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खडकी ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी संतोष अनघळ यांनी या निवडीचे कामकाज पाहिले दुपारी दोन वाजता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर श्री वाकाई देवी ग्राम समृद्धी पॅनलचे विजयी उमेदवार ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिंगटे, प्रितम शिंगटे, वैशाली शिंगटे, विभावरी शेंडे, शारदा कांबळे, छाया लांडगे यांनी तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, किसनवीर कारखाना भुईंज चे व्हाईस चेअरमन प्रमोद दादा शिंदे यांनी यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
खडकी गावचे उपसरपंच म्हणून पदभार स्वीकारताना गावातील लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन आणि प्रामाणिकपणाने गावातील कामे योग्य रीतीने मार्गी लावण्याचे आश्वासन गुजाबा आबाजी जाधव उर्फ आप्पा यांनी दिले.
यावेळी खडकी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन जिजाबा शिंगटे व दशरथ शिंगटे, माजी उपसरपंच रमेश शिंगटे तसेच विजय कालिदास शिंगटे, खडकी ग्रामस्थ व सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे ग्रामस्थ उपस्थित होते.
