योग्य मार्गदर्शकासोबत केलेला सराव विद्यार्थ्यांना यशस्वी करतो– प्रा.गोपीचंद चाटे
सातारा: चाटे शिक्षण समूह हा महाराष्ट्रातील सर्वात विद्यार्थीप्रिय समूह असून बदलत्या शैक्षणिक गरजांचा विचार करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चाटे पॅटर्नमध्ये बदल केले आणि राज्य व राष्ट्रीय पात्तळीवरील स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन देण्यासाठी सज्ज झालो, म्हणूनच चाटे समुहाच्या योग्य मार्गदर्शकांसोबत केलेला सराव विद्यार्थ्यांना यशापर्यंत घेवून जात आहे, असे चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष प्रा. गोपीचंद चाटे यांनी सांगितले, ते चाटे शिक्षण सगृह आयोजित ‘बिर्याण्ड द स्टडी’ मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये बोलत होते.
कार्यक्रमामध्ये चाटे शिक्षण समुहाचे कोल्हापूर विभागीय संचालक प्रा.डॉ.भारत खराटे यांनी विद्यार्थी पालकांना बौद्धिक मेजवानी मिळावी आणि यशाकडे झेपावताना विद्यार्थ्यांच्या पंखात ज्ञानाचे बळ द्यावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगून विद्यार्थी-पालकांना राज्य आणि देश पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षा आणि त्यांचा अभ्यास करण्याच्या वेगळ्या पद्धती यासोबतच स्पर्धा परीक्षांसंबंधी जाणीवजागृती व विद्यार्थीनिती आणि पालकनिती याबद्दल मार्गदर्शन केले,
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये चाटे शिक्षण समूह, सातारा जिल्हा समन्वयक प्रा. राजेंद्र घुले यांनी समुहाच्या चौफेर यशाचा आढावा घेवून या यशामागे चाटे पॅटर्न आणि आदरणीय चाटे सर यांचा मोलाचा वाटा असून त्यांच्या मार्गदर्शनामुळेच इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. या पुढेही हा यशाचा आलेख असाच चढता राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे सांगितले,
या कार्यक्रमामध्ये मा.राहुल चाटे यांनी यशाचा हा प्रवास सोपा आहे परंतु त्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. ध्येय ठरवणे आणि ते साध्य होईपर्यंत सातत्य ठेवणे नित्तांत गरजेचे आहे असा सल्ला दिला, कार्यक्रमामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील विविध स्पर्धा परीक्षा आणि घेतलेल्या विविध उपक्रमांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करून व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी चाटे शिक्षण समूह, पुणे विभागीय व्यवस्थापक प्रा. विजय बोबडे, प्राचार्या रंजना जाधव, श्री तुळशीदास डोईफोडे, श्री. दतात्रय सानप, श्री. रूपेश ससाणे, प्रा. सारीका भापकर यांच्यासह चाटे शिक्षण समुहाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सर्जेराव राऊत यांनी केले.



