Home » ठळक बातम्या » केडंबे गावचे नाव जगाच्या पातळीवर केवळ हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे-एकनाथ ओंबळे

केडंबे गावचे नाव जगाच्या पातळीवर केवळ हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे-एकनाथ ओंबळे

केडंबे गावचे नाव जगाच्या पातळीवर केवळ हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे-एकनाथ ओंबळे

मेढा प्रतिनिधी -२६/११च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले केडंबे गावचे सुपुत्र अशोक चक्र सन्मानित हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाब जिवंत सापडला व पाकिस्तानचा खरा चेहरा संपूर्ण जगापुढे आला. त्यामुळे हुतात्मा ओंबळे यांचे हे हौतात्म्य युवा पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन जावळी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी राम जगताप यांनी केले.

हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या सतराव्या स्मृतिदिनानिमित्त आज केडंबे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे,पोलिस उपनिरीक्षक विजय शिंगटे,मंडलाधिकारी संतोष भोसले, तलाठी संदीप ढाकणे, हवालदार धीरज बेसके,मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे,शिवसेना संपर्कप्रमुख अंकुश कदम ,सरपंच महादेव ओंबळे, राजुशेठ ओंबळे, आदिनाथ ओंबळे,बाळकृष्ण ओंबळे, बंडोपंत ओंबळे, सेवानिवृत्त सैनिक अर्जुन देशमुख, प्रा. सारंग शिंदे, प्रा. प्रमोद चव्हाण, प्रशांत तरडे, श्रीहरी गोळे, समीर गोळे, नामदेव बांदल,संदीप कासुर्डे, नंदकुमार चिकणे, अंकुश बेलोशे, प्रशांत जुनघरे,सुधीर करंदकर,सचिन शेलार, प्रसाद धनावडे, समाधान ओंबळे, सोमनाथ सुतार ,किरण ओंबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविकात शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे म्हणाले, केडंबे गावचे नाव जगाच्या पातळीवर केवळ हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे गेले आहे. त्यांच्या या बलिदानाचा इतिहास युवा पिढीसाठी दीपस्तंभ ठरणार असून हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच स्मारकाचे काम पूर्ण होणार आहे.यावेळी हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या वीर पत्नी ताराबाई तुकाराम ओंबळे यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट वाटप केले .तसेच रोहित विजय ओंबळे यांच्यामार्फत सर्वांना अल्पोपहार वाटप केले. तसेच जनसेवा विकास प्रतिष्ठान मार्फत लोकशाहीर आनंदराव दानवले यांचा पोवाडा कार्यक्रम, खाऊ वाटप करण्यात आले. व जनसेवक दत्तात्रय किसन ओंबळे यांच्याकडून शालेय मुलांना आयडेंटी कार्ड वाटप केले.शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांचे वतीने मेढा ते केडंबे दरम्यान विद्यार्थ्यांसोबत सायकल रॅली काढण्यात आली. नेहरू युवा मंडळ केडंबे चे सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थ,नेहरू युवा मंडळ, जनसेवा प्रतिष्ठान केडंबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुंबईत मरिना प्रकल्प, केंद्र सरकारकडून ८८७ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी 

Post Views: 22 मुंबईत मरिना प्रकल्प, केंद्र सरकारकडून ८८७ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी  मुंबईला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र उभारण्यासाठी केंद्र सरकारने

Live Cricket