काशीळ कोपर्डे पुलाची निविदा प्रसिद्ध आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश
सातारा- कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी आमदार झाल्यापासून कामांचा लावलेला सपाटा आणि त्यांच्या कामाची असणारी चिकाटी यामुळे गेले अनेक वर्ष प्रतीक्षेत असणारे कराड उत्तर मधील अनेक प्रकल्प मार्गी लागलेले आहेत.
गेली अनेक वर्ष काशीळ ते कोपर्डे येथील कृष्णा व उरमोडी नदीच्या संगमावरती उड्डाणपूल व्हावा या दृष्टीने प्रयत्न चालू होते या मागणीला आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यामुळे मूर्त रूप आलेले आहे. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, खासदार उदयनराजे भोसले, यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने या पुलास एकूण 44 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील सीआरफ च्या 20 कोटीची पहिल्या टप्प्याची निविदा निघाली आहे. नाबार्ड मधून मंजूर दुसऱ्या टप्पाची निविदा लवकरच निघणार असल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली
कोपर्डे पासून हायवेला येण्यासाठी अंतर फार कमी आहे. परंतु मधून नदीवरून येण्यासाठी पूल नसल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतूक करण्यासाठी फार मोठ्या अडचणी येत होत्या यासाठी या विभागातील शेतकऱ्यांची पुलासाठी फार दिवसाची मागणी होती. ही मागणी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाल्यामुळे या विभागातील शेतमाला सह लोकांना दळणवळणास पर्याय उपलब्ध होणार आहे. कृष्णा व उरमोडी नदीच्या संगमावर होणाऱ्या या महाकाय पुलामुळे पर्यटनास चालना मिळणार आहे व या परिसराचे नंदनवन होणार आहे.
काशीळ कोपर्डे पुलाची निविदा निघाल्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिक यांच्यात आनंदाचे वातावरण असून परिसरातील ग्रामस्थांकडून आमदार मनोजदादा घोरपडे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.




