Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कास पठारावरील पिसाणी येथे राजबिंड्या गरुड गणेशचे दर्शन

कास पठारावरील पिसाणी येथे राजबिंड्या गरुड गणेशचे दर्शन

कास पठारावरील पिसाणी येथे राजबिंड्या गरुड गणेशचे दर्शन

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसरात महाधनेश ऊर्फ गरुड गणेश (ग्रेट पाइड हॉर्नबिल) या पक्ष्याचे दर्शन झाले. या दुर्मीळ, राजबिंड्या पक्ष्याचे दर्शन घडल्याने पक्षी प्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे. हा पक्षी अरुणाचल प्रांतात मुख्यत्वे आढळतो. काळ्या, पिवळ्या आणि पांढऱ्या तांबूस रंगांचे आकर्षक रूप आणि मोठ्या चोचीमुळे तो लक्ष वेधून घेतो. सातारा शहरात काही ठिकाणी, तर कास पठारावरील पिसाणी येथे तीन महाधनेश पक्ष्यांचे नुकतेच दर्शन घडले.

पश्चिम घाटातील घनदाट सदाहरित आणि अर्ध-सदाहरित जंगलांमध्ये आढळतो. दाट आणि उंच झाडी असलेल्या ठिकाणी व लोकांच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी तो राहतो. उंच झाडावरील विविध प्रकारची फळे त्याचे मुख्य खाद्य आहे. शत्रूपासून संरक्षण व्हावे म्हणून उंच झाडाच्या डोलीत बसतो. तेथेच घरटे बांधतो आणि पक्ष्यांना जन्माला घालतो. 

जैवविविधतेच्या दृष्टीने हा पक्षी महत्त्वाचा समजला जातो. तो बीजप्रसार करण्यास मदत करतो आणि जंगलाच्या पुनरुत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, त्याचा मूळ अधिवास नष्ट होणे आणि शिकार यामुळे त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या पक्ष्याचे अधिवास आणि खाद्यस्रोत टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत पक्षी अभ्यासक व्यक्त करतात.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या NSS युनिट कडून श्रमसंस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन

Post Views: 35 यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या NSS युनिट कडून श्रमसंस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथील राष्ट्रीय सेवा

Live Cricket