Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये विशेष उपक्रम

कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये विशेष उपक्रम

कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये विशेष उपक्रम

कर्करोगाविषयी असलेल्या शंकांचे निरसन करत तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

सातारा – दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन पाळला जातो. कॅन्सरच्या नावाने लोकांमध्ये एक वेगळीच भीती दिसून येते. कर्करोगाविषयी लोकांना जागरुक करण्यासाठी जागतिक कर्करोग दिन पाळला जातो.या निमित्ताने साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

कर्करोगाविषयी जागरूकता वाढवणे आणि या आजाराबाबत लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे डॉ अमोल पवार, डॉ दत्तात्रय अंदुरे, डॉ तेजल गोरासिया, डॉ अहल्या नायर, डॉ मनोज लोखंडे, डॉ विजय सुतार, हॉस्पिटलच्या अध्यक्ष डॉ पुष्पलता मोतलिंग यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. याठिकाणी उपस्थित रुग्णांना गुलाब पुष्प व ओआरएसचे वाटप करण्यात आले. 

या मार्गदर्शन सत्रात कॅन्सर काय आहे, त्याची लक्षणे व उपचार पध्दती कोणत्या, पीईटी सिटी स्कॅन, रेडिएशन उपचार पध्दती व त्यामधील आधुनिकता, कर्करोगासंबंधी तपासणी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याठिकाणी कर्करोगाविषयी असलेल्या शंकांचे निरसन करुन उपस्थितांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. वेळीच निदान केल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो याबाबतही याठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वहागांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री.धनंजयराव वसंतराव पवार यांची बिनविरोध निवड

Post Views: 68 वहागांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री. धनंजयराव वसंतराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कराड प्रतिनिधी (सुनील पाटील )-

Live Cricket