कराडच्या कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खंदारेसह चौघाजणांवर कारवाई;’लाचलुचपत’ ने 5 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
कराड -सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सोमवारी सायंकाळच्या सुमारास कराड नगरपालिका परिसरात कारवाई करत नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह चौघांवर पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये कराड पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, कराड नगरपालिकेचे सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे, बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तोफिक शेख यांच्यासह अजिंक्य देव या खासगी व्यक्तीचा या प्रकरणात सहभाग लाचलुचपत विभागाच्या प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाला आहे.
कराडच्या सोमवार पेठेतील एका इमारतीस सुधारित बांधकाम परवाना देण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी पाच लाख रुपये स्वीकारताना बांधकाम विभागातील कनिष्ठ कर्मचारी तोफिक शेख रंगेहात लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.
